ठळक मुद्देअनुष्कासारखी दिसणारी ही सेलिब्रिटी अन्य कुणी नाही तर अमेरिकन सिंगर ज्युलिया माइकल्स आहे.

जगात सेम टू सेम दिसणा-या सरासरी सात व्यक्ती असतात असे म्हटले जाते. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख, अनिल कपूर, देवानंद अशा एक ना अनेक गाजलेल्या कलाकारांचे सेम टू सेम भासावे असे डुप्लिकेट आहेत. यात आता अनुष्का शर्माच्या डुप्लिकेटची भर पडली आहे. होय, हुबेहुब अनुष्कासारखी दिसणारी एक अमेरिकन सेलिब्रिटी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनुष्कासारखी दिसणारी ही सेलिब्रिटी अन्य कुणी नाही तर अमेरिकन सिंगर ज्युलिया माइकल्स आहे.
सध्या इंटरनेटवर अनुष्का व ज्युलियाच्या फोटोंचे कोलाज व्हायरल होत आहे. यात ज्युलिया व अनुष्का दोघीही अगदी सेम टू सेम दिसताहेत. तूर्तास ज्युलिया भारतात टिष्ट्वटरवर ट्रेंड होतेय. तिचे इन्स्टा अकाऊंट सर्च केले जात आहे. सोशल मीडियावर तिचे असे अनेक फोटो आहेत, ज्यात ती अगदी अनुष्कासारखी दिसतेय. ज्युलिया सिंगर आहे. शिवाय लेखिका आहे. २०१७ मध्ये ज्युलियाने संगीताच्या जगात पदार्पण केले. याचवर्षी तिचा ‘इशूज’ हे सोलो सिंगर रिलीज झाले.  
अनुष्का सारखी दिसणाºया ज्युलिया माइकल्सचे हे फोटो तुम्हीही पाहा आणि कसे वाटलेत, ते नक्की कळवा.


Web Title: the doppelganger of anushka sharma fans are going crazy to see the pictures
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.