Angelina Jolie adopts another child to take a child? | अँजोलिना आणखीन एक मुल घेणार दत्तक?
अँजोलिना आणखीन एक मुल घेणार दत्तक?

ठळक मुद्दे२०१६मध्ये अँजोलिना व ब्रॅड झाले विभक्तअँजोलिना व ब्रॅडला एकूण आहेत सहा मुले

हॉलिवूड अभिनेत्री अँजोलिना जॉली आणि तिचा पती ब्रॅड पिट यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा मिळवण्यासाठी या दोघांमध्ये वाद सुरू आहे. या जोडप्यांना एकूण सहा मुले आहेत. त्यातली तीन मुले त्यांनी दत्तक घेतलीत तर तीन मुले त्यांची स्वत:ची आहेत. एकीकडे मुलांचा ताबा मिळावा यासाठी ब्रॅड पिट प्रयत्न करतो आहे तर दुसरीकडे अँजोलिना चौथे मुल दत्तक घेण्याच्या विचारात असल्याचे समजते आहे.

कदाचित अँजोलिना सिरिआतील एका अनाथ मुलीला दत्तक घेऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. सिरियात सध्या जी परिस्थिती आहे, त्याविषयी अँजोलिना खूपच अस्वस्थ आहे. तिथल्या मुलांचे भविष्य सुधारावे यासाठी तीदेखील प्रयत्न करत आहे. त्यामुळे ती सिरियातील मुलाला दत्तक घेऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी २०१६ मध्ये विवाह केला. ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत. दोन वर्षांपूर्वी लॉस अँजेलिसला जाताना विमानात मद्यपानानंतर ब्रॅड आणि त्याचा मुलगा मॅडॉक्समध्ये वाद झाला होता. या वादानंतर ब्रॅडच्या मद्यपानाच्या व्यसनाला कंटाळलेल्या अँजोलिनाने थेट विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर तिने सहा मुलांचा ताबाही स्वतःकडेच घेतला होता. मात्र मुलांचा ताबा तिच्याकडे असला तरी तिने मुलांना वडिलांना भेटण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. अन्यथा मुलांवरचा ताबा तिला गमवावा लागेल असेही कोर्टाने तिला बजावले होते. अँजोलिनाची मुले आता मोठी होत चालली आहेत. आईसोबत ती कमी वेळ व्यतीत करतात तर दुसरीकडे ब्रॅडही विभक्त झाला आहे कदाचित हे एकटेपण दूर करण्यासाठी अँजोलिना मुल दत्तक घेत असावी असे बोलले जात आहे.


Web Title: Angelina Jolie adopts another child to take a child?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.