सीरिअस नाईट्स विथ कपिल, प्रेक्षक हसत नसल्याने 10 मिनिटात गुंडाळला कार्यक्रम

By Admin | Published: April 1, 2017 01:30 PM2017-04-01T13:30:37+5:302017-04-01T13:47:29+5:30

नुकतंच शूट करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये 10 मिनिटं झाली तरी एकही प्रेक्षक हसत नसल्याचं पाहून संतापलेल्या कपिल शर्मावर शुटिंग रद्द करण्याची नामुष्की ओढवली

Sirius Knights With Kapil, the program is not laughable due to a 10-minute rollout program | सीरिअस नाईट्स विथ कपिल, प्रेक्षक हसत नसल्याने 10 मिनिटात गुंडाळला कार्यक्रम

सीरिअस नाईट्स विथ कपिल, प्रेक्षक हसत नसल्याने 10 मिनिटात गुंडाळला कार्यक्रम

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - कॉमेडी किंग कपिल शर्मावर लोकांना हसवता हसवता आता रडण्याची वेळ आली आहे. कॉमेडी नाईट्स विथ कपिलमधील सहकारी सुनील ग्रोव्हरने साथ सोडल्याने सध्या सर्वच बाजूंनी त्याची कोंडी झाली आहे. एकट्या पडलेल्या कपिलने नवे चेहरे समोर आणले आहेत. मात्र तेदेखील अपयशी ठरत आहेत. नुकतंच शूट करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये 10 मिनिटं झाली तरी एकही प्रेक्षक हसत नसल्याचं पाहून संतापलेल्या कपिल शर्मावर शुटिंग रद्द करण्याची नामुष्की ओढवली. 
 
(कपिल आणि सुनीलमध्ये काय झालं होतं नेमकं ? संपुर्ण घटना प्रत्यक्षदर्शीच्या तोंडी)
(दारुच्या नशेत कपिल शर्माने सुनिल ग्रोवरला चोपलं)
 
कपिल शर्मासोबत झालेल्या भांडणानंतर सुनील ग्रोव्हरसहित चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुंगधा मिश्राने कार्यक्रमातून काढता पाय घेतला आहे. नव्या एपिसोडसाठी कपिलने राजू श्रीवास्तव, सुमोना चक्रवर्ती आणि किकू शारदा यांना आणून प्रेक्षकांचं मनोरंजन कऱण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यात काहीच केमिस्ट्री जुळून आली नाही. सोबतच प्रेक्षकदेखील जबरदस्तीने हसत असल्याचं पाहून कपिलने 10 मिनिटात शुटिंग रद्द करुन टाकलं. 
 
("देव होण्याचा प्रयत्न करु नकोस", सुनील ग्रोव्हरने कपिलला सुनावलं)
 
कपिलचा मित्र किकू शारदा यावेळी सेटवर उपस्थित होता. या एपिसोडच्या शुटिंगसाठी त्याने इंडियन आयडलचं शूट पुढे ढकललं होतं. स्पॉटबॉय वेबसाईटने जेव्हा त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याच्याही रागाचा पारा चढला. "हे सगळं मला का विचारत आहात ? मला एकट्याला सोडा. मला माझ्या कामाबद्दल असं जाहीरपणे बोलायला आवडत नाही", अशी संतप्त प्रतिक्रिया त्याने दिली. 
 
फक्त कपिल आणि किकू शारदा नाही तर दिग्दर्शकही संतापले होते. मात्र शुटिंग 10 ते 15 मिनिटात रद्द झालं हे मान्य करण्यास त्यांनी नकार दिला. 
 
गेल्या काही दिवसांपासून कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यातील वाद चर्चेत आहे. कपिल शर्मा आपल्या संपूर्ण टीमसह ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमध्ये शोसाठी गेला होता. हा शो संपवून हे सर्वजण ऑस्ट्रेलिया ते मुंबई असा इकॉनॉमी क्लासने प्रवास करत होते. यावेळी कपिलनं दारुच्या नशेत सुनिल ग्रोव्हरला मारहाण केली. या मारहाणीवेळी कपिल शर्माने सुनिल ग्रोवरसाठी अपमानास्पद भाषेचाही वापर केला होता. यानंतर सुनील ग्रोव्हरने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.
 

Web Title: Sirius Knights With Kapil, the program is not laughable due to a 10-minute rollout program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.