श्रद्धा कपूरच्या "हसीना - द क्वीन ऑफ मुंबई" चित्रपटाचा टीझर रिलीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2017 08:54 PM2017-06-16T20:54:53+5:302023-08-08T15:58:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची मुख्य भूमिका असलेल्या हसीना: द क्वीन ऑफ मुंबईचा टीझर रिलीज झाला.

Release of Teaser of Shraddha Kapoor's "Hasina - The Queen of Mumbai" movie | श्रद्धा कपूरच्या "हसीना - द क्वीन ऑफ मुंबई" चित्रपटाचा टीझर रिलीज

श्रद्धा कपूरच्या "हसीना - द क्वीन ऑफ मुंबई" चित्रपटाचा टीझर रिलीज

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची मुख्य भूमिका असलेल्या हसीना: द क्वीन ऑफ मुंबईचा टीझर रिलीज झाला. गेल्या ब-याच दिवसांपासून दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाची चर्चा आहे. तत्पूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटातील एका पोस्टरची झलकही काही दिवसांपूर्वी दर्शित करण्यात आली होती. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या चित्रपटातील पहिले पोस्टर तिच्या ट्विटर अकाउंन्टवर अपलोड केले आहे.  

"हसीना - द क्वीन ऑफ मुंबई"  या चित्रपटातील तिचे हे पोस्टर असून, या चित्रपटासाठी तिने लूक बदलल्याचे पाहायला मिळते आहे. "हसीना - द क्वीन ऑफ मुंबई"  हा एक बायोपिक आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर हसीनाची भूमिका साकारणार आहे.  दरम्यान, या चित्रपटात श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर दाऊद इब्राहिमची भूमिका निभावणार आहे. तसेच नाहिद खानची निर्मिती असलेला "हसीना - द क्वीन ऑफ मुंबई" हा चित्रपट अपूर्व लखिया यांनी दिग्दर्शित केला असून, तो चित्रपट 14 जुलै 2017 रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

("हसीना - द क्विन ऑफ मुंबई" मधील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक)

6 जुलै 2014मध्ये हसीना पारकरचा मृत्यू झाला होता. हसीनावर न्यायालयात जवळपास 88 खटले दाखल होते. तरीही आयुष्यात तिने एकदाच कोर्टाची पायरी चढली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हसीना तिचा भाऊ दाऊदची मुंबईतील जवळपास 1000 कोटी रुपयांची साम्राज्य सांभाळत होती. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच वास्तवातील भाऊ-बहीण चित्रपटातही भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारणार आहेत.

 

Web Title: Release of Teaser of Shraddha Kapoor's "Hasina - The Queen of Mumbai" movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.