'H2O' फेम शीतलने असा साजरा केला तिचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 05:21 PM2019-04-26T17:21:42+5:302019-04-26T17:26:28+5:30

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणारी शीतल अहिरराव चित्रपटाप्रमाणेच प्रत्यक्षात ही समाजप्रबोधन घडवत असून नाशिक मधील उंटवाडी रोडवरील निरीक्षण गृह व बालगृहातील गरीब-अनाथ मुलांना 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट दाखवून आनंद घेतला.

H2O fame sheetal ahirrao celebrate her birthday this way | 'H2O' फेम शीतलने असा साजरा केला तिचा वाढदिवस

'H2O' फेम शीतलने असा साजरा केला तिचा वाढदिवस

googlenewsNext
ठळक मुद्देपदार्पणातच शीतलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणारी शीतल अहिरराव चित्रपटाप्रमाणेच प्रत्यक्षात ही समाजप्रबोधन घडवत असून नाशिक मधील उंटवाडी रोडवरील निरीक्षण गृह व बालगृहातील गरीब-अनाथ मुलांना 'H2O कहाणी थेंबाची' हा चित्रपट दाखवून आनंद घेतला.

मूळच्या नाशिकच्या शीतल अहिररावचा हा वाढदिवस ही ती ह्या लहानग्यांसोबतचे  अविस्मरणीय साजरा करते,आपल्या वाढदिवशी समोरच्याच्या आयुष्यात थोडा का होईना पण आनंद आणू शकले हेच माझ्यासाठी मोठठं गिफ्ट आहे असं ती म्हणते. शीतलला आपण ह्याआधी 'वॉक तुरु तुरु', ल'ई भारी पोरी', 'इश्काचा किडा' या म्युझिक अल्बम्समधून शिवाय 'जलसा', 'मोल, 'व्हीआयपी गाढव', 'फक्त एकदाच', 'होरा', 'सलमान सोसायटी'  यांसारख्या चित्रपटांतून पाहिलेलं आहे. 'H2O कहाणी थेंबाची' या मराठी चित्रपटात तिने उल्लेखनीय कामगिरी केलेली असून  आपल्या पदार्पणातच शीतलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

  'H2O' या चित्रपटात सियाची मध्यवर्ती भूमिका साकारणारी शीतल अहिरराव आपल्या आगामी कारकिर्दीत एका हिंदी मालिकेतही झळकणार आहे. या मालिकेची घोषणा लवकरच होणार आहे. शीतलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास विविधतेने नटलेला असून शीतल आपल्या कामाविषयी प्रचंड जागरूक आहे. तिच्या प्रयत्नांना रसिकांच्या पसंतीची पावती नक्कीच मिळेल ह्यात काही शंका नाही.  

Web Title: H2O fame sheetal ahirrao celebrate her birthday this way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.