माँ, तुझे सलाम

By Admin | Published: August 1, 2015 05:12 AM2015-08-01T05:12:32+5:302015-08-01T05:12:32+5:30

मराठीतील पहिली गोल्डन हिट ‘सांगत्ये ऐका’, ‘जय मल्हार’, ‘साधी माणसं’ यांसारख्या चित्रपटांतून नायिकेची भूमिका साकारल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीत आईच्या भूमिकेला वेगळी उंची देणाऱ्या

Mama, salute you | माँ, तुझे सलाम

माँ, तुझे सलाम

googlenewsNext

मराठीतील पहिली गोल्डन हिट ‘सांगत्ये ऐका’, ‘जय मल्हार’, ‘साधी माणसं’ यांसारख्या चित्रपटांतून नायिकेची भूमिका साकारल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीत आईच्या भूमिकेला वेगळी उंची देणाऱ्या अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी सलाम केला. सुलोचना यांचा ८६वा वाढदिवस काल साजरा झाला. त्यांच्या घरी जाऊन अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या. अत्यंत नम्रतेने त्यांना वाकून नमस्कार केला. सुलोचना यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिकाही अनेक चित्रपटांत साकारली आहे. अमिताभ यांनी याबाबत टिष्ट्वट केले असून, त्यात म्हटले आहे, ‘बडोंको सलाम. सुलोचनाजी का जन्म दिवस. माँ की भूमिका कितनी बार निभायी फिल्मो में’
बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' या गाजलेल्या चित्रपटात आणि त्यांच्याच 'दो और दो पाँच' मध्ये त्यांच्यासोबत भूमिका रंगवणारी दोन लहान मुले म्हणजे अनुक्रमे राजू देसाई आणि विशाल देसाई! या दोघांचे तब्बल ४० वर्षांचे ऋणानुबंध अचानक कामी आल्याचे उदाहरण आता कायम झाले आहे आणि त्यासाठी चक्क मराठी चित्रपटसृष्टी निमित्तमात्र ठरली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या मनाचा मोठेपणा अनेकविध घटनांतून प्रकट होत असतो आणि एका मराठी चित्रपटाच्या व्यासपीठावरही तसेच घडले. राजू व विशाल देसाई यांचे दिग्दर्शन असलेल्या 'ढोलकी' या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यासाठी या दोघांनी अमिताभ बच्चन यांना निमंत्रण देताच, त्यांनी ४० वर्षांची ओळख लक्षात ठेवून एका क्षणात या सोहळ्याला यायचे पक्के केले आणि त्यांच्याच हस्ते हा संगीत अनावरण सोहळा पार पडला.
या निमित्ताने अमिताभ बच्चन थेट मराठी चित्रपटाच्या व्यासपीठावर अवतरले. विशेष म्हणजे, या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा सिद्धार्थ जाधव, कश्मिरा कुलकर्णी आणि मानसी नाईक या मराठमोळ्या कलावंतांसोबत अमिताभ बच्चन यांनी खास फोटोसेशनही केले. आजचा मराठी चित्रपट मोठी झेप घेत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद करत मराठी चित्रपटांच्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या.

‘बिग बी’कडूनही मराठी चित्रपटांचे कौतुक
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या वेळी मराठी चित्रपटांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘ मराठी चित्रपटसृष्टी वेगाने विस्तारत आहे. मंथनातून अनेक चांगल्या गोष्टी बाहेर निघत आहेत. चांगल्या कथा आणि कल्पना बाहेर येत आहेत.’’

Web Title: Mama, salute you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.