प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 09:27 AM2024-05-13T09:27:12+5:302024-05-13T09:28:10+5:30

कन्नड टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम हिचं कार अपघातात निधन झालं आहे. अपघातात पवित्रा जयराम हिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

kannada tv actress pavitra jayram dies in car accident | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...

कन्नड टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम हिचं कार अपघातात निधन झालं आहे. हैदराबादमधील मेहबूब नगर येथे ही अभिनेत्रीच्या कारचा अपघात झाला. अभिनेत्री ज्या कारमधून प्रवास करत होती त्या कारने एका बसला जबर धडक दिली. या अपघातात पवित्रा जयराम हिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री पवित्राबरोबर गाडीत तिची चुलत बहीण अपेक्षा आणि अभिनेता चंद्रकांतही प्रवास करत होते. या अपघातात पवित्राची बहीण, अभिनेता चंद्रकांत आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. पहिल्यांदा कार डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर समोरून येणाऱ्या बसने धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघतात पवित्राचा जागीच मृत्यू झाला. 

पवित्रा ही कन्नड टीव्हीचा लोकप्रिय चेहरा होती. अनेक लोकप्रिय कन्नड मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा होता. याशिवाय तिने तेलुगु मालिकांमध्येही काम केलं होतं. तिच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पवित्राला श्रद्धांजली वाहिली जात आहे. 

Web Title: kannada tv actress pavitra jayram dies in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.