नर्गिसला मिळतायेत आयटम साँग्जच्या ऑफर्स

By Admin | Published: July 29, 2014 11:18 PM2014-07-29T23:18:24+5:302014-07-29T23:18:24+5:30

‘किक’ या चित्रपटातील आयटम साँगमध्ये सलमान खानसोबत ठुमके लगावणा:या नर्गिस फाखरीची स्टार व्हॅल्यू आता बरीच वाढली आहे.

Item Song offers for Nargis | नर्गिसला मिळतायेत आयटम साँग्जच्या ऑफर्स

नर्गिसला मिळतायेत आयटम साँग्जच्या ऑफर्स

googlenewsNext
‘किक’ या चित्रपटातील आयटम साँगमध्ये सलमान खानसोबत ठुमके लगावणा:या नर्गिस फाखरीची स्टार व्हॅल्यू आता बरीच वाढली आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादाचा फायदा नर्गिसलाही होताना दिसतोय. विशेष करून आयटम साँगसाठी नर्गिसची मागणी वाढली आहे. एका दक्षिण भारतीय चित्रपटातही नर्गिस आयटम साँग करणार असल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तिला एक कोटी रुपये फी मिळणार आहे. ‘शाशम’ असे नाव असलेल्या या चित्रपटातून दिग्दर्शक प्रशांत कमबॅक करीत आहेत. त्यामुळे चित्रपट यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सर्वच गोष्टी करण्याकडे दिग्दर्शकाचा कल आहे. त्यामुळेच कोरियोग्राफर प्रभू देवाने नर्गिसचे नाव आयटम साँगसाठी सुचवले. आयटम साँग करणो नर्गिससाठीही फायद्याचे आहे. कारण एकाच आयटम साँगमधून तिची एक कोटीची कमाई होत आहे.

 

Web Title: Item Song offers for Nargis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.