‘कौल मनाचा’ चित्रपटाचा भव्य प्रीमिअर

By Admin | Published: October 26, 2016 04:42 AM2016-10-26T04:42:05+5:302016-10-26T04:42:05+5:30

‘कौल मनाचा’ या सिनेमाचा भव्य प्रीमिअर शो नुकताच मुंबईत झाला. सिनेमातील स्टारकास्टसह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मंडळी या वेळी उपस्थित होती.

The grand premiere of 'Kaul Mancha' | ‘कौल मनाचा’ चित्रपटाचा भव्य प्रीमिअर

‘कौल मनाचा’ चित्रपटाचा भव्य प्रीमिअर

googlenewsNext


‘कौल मनाचा’ या सिनेमाचा भव्य प्रीमिअर शो नुकताच मुंबईत झाला. सिनेमातील स्टारकास्टसह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मंडळी या वेळी उपस्थित होती.
वेगळ्या विषयाच्या चित्रपट निर्मितीबद्दल मान्यवरांनी निर्माता-दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक केले. या प्रीमिअरप्रसंगी आपल्या पाल्यासोबत उपस्थित असलेल्या पालकांनी हा चित्रपट वास्तवदर्शी असल्याची प्रतिक्रिया या वेळी व्यक्त केली.
रेडबेरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत श्री सदिच्छा फिल्म्सनिर्मित ‘कौल मनाचा’ या चित्रपटात बालमनाचा वेध घेण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भीमराव मुडे यांचे आहे. अनेक गोष्टींवर भुलण्याच्या या वयात मुलांची मानसिक घालमेल लक्षात घेऊन त्यांना योग्य-अयोग्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे असते, हे सांगण्याचा प्रयत्न ‘कौल मनाचा’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.
सिनेमा माध्यमाने भारावलेल्या राज कुंडल या मुलाची कथा यात मांडली आहे. किशोरवयीन मुलांना अनेक गोष्टींचे कुतूहल असते. बऱ्याचदा मोठ्यांकडून या कुतुहलाबद्दल योग्य ती चिकित्सा होत नाही. त्यामुळे आपल्या मनातील कुतुहलाविषयी जाणून घेण्यासाठी ते अनेकदा चुकीचा मार्ग चोखळतात. याच विषयावर ‘कौल मनाचा’ या
सिनेमात भाष्य करण्यात आले
आहे. सिनेमावेड्या राजच्या
आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना तो कशाप्रकारे समोरे जातो? या प्रवासात त्याला कोणाची साथ मिळते?
याची रंजक तितकीच भावस्पर्शी
कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या सिनेमात राजेश शुंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले, वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरिजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

 

Web Title: The grand premiere of 'Kaul Mancha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.