यंदा जोड्यांची रोमॅँटिक केमिस्ट्री पडद्यावर रंगणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 06:41 PM2019-01-06T18:41:21+5:302019-01-06T18:47:33+5:30

आता यावर्षीही काही नवीन जोड्यांची केमिस्ट्री चित्रपटांत बघावयास मिळणार आहे, मात्र फरक हा असणार आहे की, या जोड्या रिअल नसून रील लाइफपुरताचमर्यादित असणार आहेत. विशेष म्हणजे रुपेरी पडद्यावर या जोड्या पहिल्यांदा दिसणार आहेत. 

This year, couples will play romantic chemistry screen! | यंदा जोड्यांची रोमॅँटिक केमिस्ट्री पडद्यावर रंगणार !

यंदा जोड्यांची रोमॅँटिक केमिस्ट्री पडद्यावर रंगणार !

googlenewsNext

-रवींद्र मोरे 
गेल्यावर्षी रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण ही जोडी रील लाइफवरुन रिअल लाइफमध्ये पदार्पण करणारी यशस्वी जोडी ठरली. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटाबरोबरच खऱ्या  आयुष्यातही बघावयास मिळाली. आता यावर्षीही काही नवीन जोड्यांची केमिस्ट्री चित्रपटांत बघावयास मिळणार आहे, मात्र फरक हा असणार आहे की, या जोड्या रिअल नसून रील लाइफपुरताचमर्यादित असणार आहेत. विशेष म्हणजे रुपेरी पडद्यावर या जोड्या पहिल्यांदा दिसणार आहेत. 

* रणवीर सिंह - आलिया भट्ट (गली बॉय) 
'गली बॉय' या चित्रपटाच्या माध्यमातून रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांची यंदाची सर्वात धमाकेदार जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या सिनेमाचा नुकताच पहिला लूक  समोर आला आहे. या चित्रपटाची कथा स्ट्रीट रॅपर विवियन फर्नांडिस उर्फ डिवाइन आणि नावेद शेख उर्फ नेजी यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाला जोया अख्तर दिग्दर्शित करत असून व्हॅलेंटाईन डेच्या पुढच्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

* कार्तिक आर्यन - कृति सेनन (लुक्काछिपी) 
कार्तिक आर्यनचा गेल्या वर्षाचा 'सोनू के टीटू की स्वीटी' हा चित्रपट सुपरहिट ठरला. यंदा कार्तिक  'लुक्काछिपी' या चित्रपटाच्या माध्यमातून नव्या अभिनेत्रीसोबत दिसणार आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ही गोष्ट मथुराची असून कार्तिक आर्यन यामध्ये एका टीव्ही रिपोर्टर मुलीच्या प्रेमात पडतो. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. 

* सोनम कपूर - दुलकर सलमान (द जोया फॅक्टर) 
साऊथचा हिट अभिनेता दुलकीर सलमानसोबत यावर्षी सोनम कपूर 'द जोया फॅक्टर'मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार असून ही गोष्ट अनुजा चौहान यांच्या पुस्तकावर हा सिनेमा आहे. ५ एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

* टायगर श्रॉफ - अनन्या पांडे (स्टुंडट ऑफ  द ईअर 2) 
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टुडंट ऑफ द ईअर या सिनेमाचा सिक्वल असणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ आणि लोकप्रिय अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे दिसणार आहे. १० मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून पुनीत मल्होत्रा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. 

*शाहिद कपूर - किआरा आडवाणी (कबीर सिंह) 
'अर्जुन रेड्डी' चा रिमेक 'कबीर सिंह' या चित्रपटात शाहिद कपूर आणि किआरा आडवाणीची केमिस्ट्री रंगणार आहे. चार वर्षाअगोदर डेब्यू करणारी अभिनेत्री किआरा आडवाणीने २०१८ मध्ये ओरीजनल-लस्ट स्टोरीजमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होतं. आता किआरा शाहिदसोबत दिसणार आहे. हा सिनेमा २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: This year, couples will play romantic chemistry screen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.