Valentine Day Special 2019 : खऱ्या प्रेमाची परिभाषा शिकवली चित्रपटांनी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 08:00 AM2019-02-14T08:00:00+5:302019-02-14T08:00:03+5:30

-रवींद्र मोरे    फेब्रुवारीचा महिना प्रेम करणाऱ्यांसाठी खूपच स्पेशल असतो. याला ‘लव मंथ’ म्हटला तरी चुकीचे ठरणार नाही. या ...

Valentine Day Special 2019: Movies Definition of True Love! | Valentine Day Special 2019 : खऱ्या प्रेमाची परिभाषा शिकवली चित्रपटांनी !

Valentine Day Special 2019 : खऱ्या प्रेमाची परिभाषा शिकवली चित्रपटांनी !

googlenewsNext

-रवींद्र मोरे 
 
फेब्रुवारीचा महिना प्रेम करणाऱ्यांसाठी खूपच स्पेशल असतो. याला ‘लव मंथ’ म्हटला तरी चुकीचे ठरणार नाही. या महिन्यात १४ तारखेला व्हॅलेंटाइन डे असतो. मात्र या दिवसाच्या अगोदरचे दिवसही प्रेमविरांसाठी विशेष दिवस असतात. अतिशय उत्साहात साजरा होणारा हा संपूर्ण आठवडा या प्रेमिकांसाठी वेगवेगळे रंग घेऊन येत असतो. विशेषत: खऱ्या  प्रेमाची परिभाषा दर्शविण्यासाठी बॉलिवूड चित्रपटांचे खूपच योगदान आहे. आज आपण अशाच चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यात आगळीवेगळी आणि उत्कृष्ट प्रेम कहाणी दाखविण्यात आली आहे.  

* मुगल-ए-आजम
हा चित्रपट एक राजाचा मुलगा सलीमची प्रेम कहाणी दर्शवितो, जो एक नाचकाम करणारी  (मधुबाला) महिलेच्या प्रेमात पडतो. सलीम त्याच्या प्रेमाला मिळविण्यासाठी वडिलांशी लढाई देखील करतो. हा चित्रपट १९६० मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला, दुर्गा खोटे आणि नौसाद यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील गाणे आणि संवाद आजही लोकांच्या तोंडावर आहेत.  

* बर्फी
रणबीर कपूर, इलियाना डीक्रूज आणि प्रियंका चोप्रा स्टारर या चित्रपटास खूपच उत्कृष्ट चित्रपट मानला जाऊ  शकतो. या चित्रपटात खऱ्या  खुऱ्या  प्रेमाच्या शोधाला अतिशय चांगल्याप्रकारे सादर करण्यात आले आहे, ज्यात एक मुलगी अशा मुलावर प्रेम करते ज्याला बोलताही येत नाही आणि ऐकायलाही येत नाही. त्यातच हा मुलगा स्वत:सारख्या परफेक्ट मुलीला शोधत असतो. हा चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसुने केले होते.  

 * तेरे नाम
बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान चित्रपटात खूपच कमी रोमॅँटिक नायकाची भूमिका साकारतो. मात्र ‘तेरे नाम’ बाबत बोलायचं झालं तर या चित्रपटातील सलमानच्या रोमॅँटिक अंदाजाचा प्रत्येकजण दिवाना होऊ शकतो. सलमान आणि भूमिका चावलाचा हा चित्रपट २००३ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अशा प्रेमाला दाखविण्यात आले आहे, ज्यात एक मुलगी शेवटपर्यंत त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही, मात्र जेव्हा स्वीकार करते तेव्हा मात्र त्या मुलासोबत त्याचे नशिब खूपच वाईट खेळ खेळते. अर्धवट प्रेमाची उत्कृष्ट कथा आहे ‘तेरे नाम’. 

* जब तक है जान
उत्कृष्ट प्रेम कथा दर्शविणारा शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्माचा हा चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्राने केले होते. या चित्रपटात दोन प्रेम करºयांची अशी कथा दाखविण्यात आली आहे जे एकमेकांच्या सुखासाठी वेगळे होतात, मात्र काही काळानंतर ते पुन्हा एक होतात. यात शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ दरम्यान खूपच उत्कृष्ट लव्ह केमिस्ट्री दाखविण्यात आली आहे.  

* द लंच बॉक्स
या चित्रपटातही उत्कृष्ट प्रेम कथा दाखविण्यात आली आहे. यात इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निम्रत कौर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०१३ मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाची कथा एक खाण्याचा ‘लंच बॉक्स’ द्वारा सुरु होतो. हा बॉक्स निम्रत कौर तिच्या पतीसाठी पाठविते, जो चुकून दुसरा व्यक्ती अर्थात इरफान खानपर्यंत पोहचतो आणि त्यानंतर दोघांची प्रेम कहाणी सुरु होते.  

* वीर-जारा
कोणीतरी म्हटले आहे की प्रेमात  एक प्रेमी कोणत्याही सीमेपलिकडे जाऊ शकतो. हीच गोष्ट शाहरुख खानने वीर जारा चित्रपटात प्रतापसिंह बनून खरी करुन दाखवली. या चित्रपटात हिंदूस्थानचा वीर (शाहरुख खान)ला पाकिस्तानची जारा (हयात खान) वर प्रेम जडते. एकमेकांना मिळविण्यासाठी हे दोघेही जण आयुष्यभर संघर्ष करतात. या चित्रपटात शाहरुख खान पाकिस्तानच्या जेलमध्ये त्याच्या प्रेमाच्या प्रतीक्षेत २२ वर्ष व्यतित करतो. या उत्कृष्ट चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. हा चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला होता.  

Web Title: Valentine Day Special 2019: Movies Definition of True Love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.