गायक अंकित तिवारीला कन्यारत्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 02:37 PM2019-01-03T14:37:22+5:302019-01-03T14:55:16+5:30

बॉलिवूड सिंगर अंकित तिवारी सध्या जाम आनंदात आहे. त्याला कारणही तसेच आहे. होय, अंकितच्या घरी कन्यारत्न जन्मले आहे. गत २८ डिसेंबरला अंकितची पत्नी पल्लवी हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

Singer Ankit Tiwari and wife Pallavi blessed with a baby girl | गायक अंकित तिवारीला कन्यारत्न!

गायक अंकित तिवारीला कन्यारत्न!

googlenewsNext

बॉलिवूड सिंगर अंकित तिवारी सध्या जाम आनंदात आहे. त्याला कारणही तसेच आहे. होय, अंकितच्या घरी कन्यारत्न जन्मले आहे. गत २८ डिसेंबरला अंकितची पत्नी पल्लवी हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अंकित व पल्लवीचे हे पहिले अपत्य आहे. दोघांनीही आपल्या मुलीचे आर्या असे नामकरण केले आहे. अलीकडे एका मुलाखतीत अंकितने ही गोड बातमी शेअर केली. मी माझ्या भावना शब्दांत सांगू शकत नाही. मुलीला पहिल्यांदा हातात घेतले, तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत खास क्षण होता. माझे कुटुंब आता पूर्ण झाले. पल्लवी आणि माझी मुलगी दोघंही अगदी स्वस्थ आहेत, असे अंकितने सांगितले.

गत २३ फेबु्रवारीला अंकित व पल्लवी शर्मा यांनी लग्नगाठ बांधली होती.अंकितच्या आजीला पल्लवी झांसी रेल्वे स्टेशनवर एक सुंदर मुलगी भेटली होती. अंकितच्या आजीला पल्लवी ऐवढी आवडली की तिने घरी अंकित आणि पल्लवीच्या लग्नाची बोलणी केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांकडून या लग्नासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. पल्लवी लग्नाआधी बंगळुरुमध्ये काम करत होती. मात्र लग्नानंतर ती अंकितसोबत मुंबईत शीफ्ट झालीय.

‘सून रहा है ना तू’ या ‘आशिकी 2’मधील गाण्याने अंकितला खरी लोकप्रीयता दिली. सुरुवातीला भजन, जागरण गात असतानाच अंकितला बॉलिवूडची ओढ लागली. २०१० सालापासून पार्श्वगायन व संगीत दिग्दर्शन करणारा अंकित सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला. सर्वोत्तम पार्श्वगायक व सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक हे दोन्ही फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

‘आशिकी 2’ चित्रपटामधील ‘सुन रहा है’ या गाण्यामुळे अंकित प्रसिद्धीझोतात आला. यच चित्रपटाच्या संगीतासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले.

Web Title: Singer Ankit Tiwari and wife Pallavi blessed with a baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.