शाहरुख खानची ‘सिग्नेचर स्टाईल’ कमी करणार का रस्त्यांवरचे अपघात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 04:59 PM2018-07-29T16:59:04+5:302018-07-29T17:00:42+5:30

बॉलिवूडचा रोमॅन्टिक हिरो म्हटल्यावर शाहरूख खान नजरेसमोर येतो. विशेषत: त्याची सिग्नेचर स्टाईल हमखास आठवते. शाहरूखची हीच सिग्नेचर स्टाईल सध्या आसामच्या रस्त्यारस्त्यांवर दिसतेय. 

sha rukh khan signature pose used for traffic police awareness | शाहरुख खानची ‘सिग्नेचर स्टाईल’ कमी करणार का रस्त्यांवरचे अपघात?

शाहरुख खानची ‘सिग्नेचर स्टाईल’ कमी करणार का रस्त्यांवरचे अपघात?

googlenewsNext

बॉलिवूडचा रोमॅन्टिक हिरो म्हटल्यावर शाहरूख खान नजरेसमोर येतो. विशेषत: त्याची सिग्नेचर स्टाईल हमखास आठवते. शाहरूखची हीच सिग्नेचर स्टाईल सध्या आसामच्या रस्त्यारस्त्यांवर दिसतेय. गोंधळलातं ना? पण हे खरे आहे. रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आसामच्या वाहतूक पोलिसांनी शाहरूखच्या सिग्नेचर स्टाईलचा प्रचंड खुबीने वापर केला आहे. रस्त्यांवर होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच लोकांनी वाहतूक नियम पाळावे यासाठी आसामच्या वाहतूक पोलिसांनी नाही नाही त्या उपाययोजना केल्यात. मग त्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली. होय, ही शक्कल म्हणजे शाहरूखची सिग्नेवर स्टाईल. होय, आसामच्या वाहतूक पोलिसांनी एक अ‍ॅनिमेटेड फोटो तयार केला. या फोटोत त्यांनी शाहरूखच्या सिग्नेचर स्टाईलचा वापर केला. मग काय, आसामच्या वाहतूक पोलिसांची ही क्रिएटीव्ह जाहिराती सोशल मीडियावर काहीच क्षणात व्हायरल झाली.



 या फोटोत तुम्ही शाहरूखची सिग्नेचर पोज, ट्रॅफिक लाईट्स आणि झेब्रा क्रॉसिंग पाहू शकता. आसाम पोलिसांनी हा फोटो रिट्विट केला. ‘ट्रॅफिक नियम नहीं फॉलो करने से कुछ कुछ नही, बहुत कुछ होता है,’ असे त्यांनी लिहिले.
खुद्द शाहरूखनेही हा फोटो रिट्विट करत आसामच्या वाहतूक पोलिस विभागाचे विशेष आभार मानलेत. ‘या पोजद्वारे दिला गेलेला हा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम संदेश आहे. कृपया वाहतुकीचे नियम पाळा’, असे त्याने लिहिले. आता आसामच्या वाहतूक पोलिसांनी लढवलेल्या युक्तीचा आणि शाहरूखच्या आवाहनाचा किती परिणाम होतो, तेच तेवढ बघायचे.


शाहरुख खानची ‘सिग्नेचर स्टाईल’ कमी करणार का रस्त्यांवरचे अपघात?
बॉलिवूडचा रोमॅन्टिक हिरो म्हटल्यावर शाहरूख खान नजरेसमोर येतो़ विशेषत: त्याची सिग्नेचर स्टाईल हमखास आठवते़ शाहरूखची हीच सिग्नेचर स्टाईल सध्या आसामच्या रस्त्यारस्त्यांवर दिसतेय़ गोंधळलातं ना? पण हे खरे आहे़ रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आसामच्या वाहतूक पोलिसांनी शाहरूखच्या सिग्नेचर स्टाईलचा प्रचंड खुबीने वापर केला़ रस्त्यांवर होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच लोकांनी वाहतूक नियम पाळावे यासाठी आसामच्या वाहतूक पोलिसांनी नाही नाही त्या उपाययोजना केल्यात़ मग त्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली़ होय, ही शक्कल म्हणजे शाहरूखची सिग्नेवर स्टाईल़ होय, आसामच्या वाहतूक पोलिसांनी एक अ‍ॅनिमेटेड फोटो तयार केला़ या फोटोत त्यांनी शाहरूखच्या सिग्नेचर स्टाईलचा वापर केला आहे़ मग काय, आसामच्या वाहतूक पोलिसांची ही क्रिएटीव्ह जाहिराती सोशल मीडियावर काहीच क्षणात व्हायरल झाली़ या फोटोत तुम्ही शाहरूखची सिग्नेचर पोज, ट्रॅफिक लाईट्स आणि झेब्रा क्रॉसिंग पाहू शकता़ आसाम पोलिसांनी हा फोटो रिट्विट केला़ ‘ट्रॅफिक नियम नहीं फॉलो करने से कुछ कुछ नही, बहुत कुछ होता है,’ असे त्यांनी लिहिले़
खुद्द शाहरूखनेही हा फोटो रिट्विट करत आसामच्या वाहतूक पोलिस विभागाचे विशेष आभार मानले जात आहे़ ‘या पोजद्वारे दिला गेलेला हा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम संदेश आहे़ कृपया वाहतुकीचे नियम पाळा’, असे त्याने लिहिले़ आता आसामच्या वाहतूक पोलिसांनी लढवलेल्या युक्तीचा आणि शाहरूखच्या आवाहनाचा किती परिणाम होतो, तेच तेवढ बघायचे आहे़

Web Title: sha rukh khan signature pose used for traffic police awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.