Shahrukh khan share Zero Film Unofficial Animated teaser video On Social Media | जे न आवडे कुणाला, ते आवडले किंग खानला, ट्रोल होणारा व्हिडीओ शाहरुखने केला शेअर
जे न आवडे कुणाला, ते आवडले किंग खानला, ट्रोल होणारा व्हिडीओ शाहरुखने केला शेअर

जबरा फॅन हो गया हे गाणं तर बॉलीवुडच्या बाहशाहच्या प्रत्येक फॅनसाठी तंतोतंत लागू पडतं. शाहरुखच्या अशाच एका जबरा फॅनचा किस्सा सध्या बी टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. किंग खान शाहरुखचेही ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर अनेक फॅन्स आहेत. मात्र या सगळ्या फॅन्सपैकी एक फॅन शाहरुखचा ख-या अर्थाने जबरा फॅन ठरला आहे.

आनंद एल.राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून या टीझरने सर्वांचेचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा बादशहा अर्थात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. एका चाहत्याने या टीझरचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ तयार केला आहे. मात्र शाहरुखला हा व्हिडिओ आवडला असून त्याने तो शेअरदेखील केला आहे.सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.शाहरूखने आपला व्हि़डीओ शेअर केला म्हटल्यावर हा जबरा फॅन भलताच खुश झाला असणार हे मात्र नक्की.  


शाहरुखच्या या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकार आपल्याला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा देखील शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटात काही मिनिटांसाठी त्यांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचसोबत आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता देखील आपल्याला या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. आर माधवन या चित्रपटात एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात त्याच्यासोबत आपल्याला जिमी शेरगिलला देखील पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. 

 


Web Title: Shahrukh khan share Zero Film Unofficial Animated teaser video On Social Media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.