साराने पुन्हा केले फोटोशूट, दिसला ग्लॅमरस अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:55 PM2019-04-04T13:55:58+5:302019-04-04T13:59:42+5:30

फोटोशूटच्या निमित्ताने पुन्हा एकदा साराच्या हटके स्टाइलची अनुभूती रसिकांना येत आहे. सध्या सारा आपल्या स्टाइलने साऱ्यांवर मोहिनी घालत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sara Ali Khan Glamorous Photoshoot | साराने पुन्हा केले फोटोशूट, दिसला ग्लॅमरस अंदाज

साराने पुन्हा केले फोटोशूट, दिसला ग्लॅमरस अंदाज

googlenewsNext

स्टाइल हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असतो. तिच्या अभिनयाने तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर सध्या तिच्या अभिनयाइतकंच तिच्या स्टाइलचाही बोलबाला पाहायला मिळत आहे. खरंतर केदारनाथ सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकण्याआधीच साराने आपल्या स्टाइल आणि फॅशनने साऱ्यांची मने जिंकली.  सिनेमाचे प्रमोशन किंवा मग बॉलीवुड पार्ट्यांमध्ये साराची स्टाइल चर्चेचा विषय ठरली. नुकतेच तिने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.  

वोग मॅगेझिनसाठी हे खास फोटोशूट केले आहे. फोटोशूटच्या निमित्ताने पुन्हा एकदा साराच्या हटके स्टाइलची अनुभूती रसिकांना येत आहे. सध्या सारा  आपल्या स्टाइलने साऱ्यांवर मोहिनी घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. आई अमृता सिंहच्या पावलावर पाऊल ठेवत सारासुद्धा आपल्या हटके ड्रेसिंग आणि फॅशनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

सारा खूप मेहनती आहे हे तिने इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच सिद्ध केले आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास इतका सोपा नव्हता. कारण आता दिसणारी सारा आणि पूर्वीची सारा यांच्यात जमीन आसमानचा फरक होता. पूर्वी ती खूप लठ्ठ होती, तिचं वजनही नव्वदच्यावर होते. मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर साराने अशक्य ते शक्य करून दाखवले. सुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते. हे पाहून साराला अक्षरक्षा रडू कोसळले होते.

यावेळी आपल्याला अभिनेत्री बनायचे आहे अशी इच्छाही तिने आई अमृता सिंहकडे व्यक्त केली होती. त्यावेळी अमृता सिंह म्हणजे साराच्या आईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. शिक्षण लवकर पूर्ण करून तिला अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून पदवीच्या दोन वर्षाचं शिक्षण तिने एका वर्षात पूर्ण केलं. त्यानंतर वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो करत  फॅट टू फिट अभिनेत्री बनली. 

Web Title: Sara Ali Khan Glamorous Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.