अभिषेक बच्चन या कारणामुळे मनमर्जियां चित्रपटाद्वारे करतोय कमबॅक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 07:31 PM2018-08-25T19:31:27+5:302018-08-25T19:33:34+5:30

मनमर्जियां हा चित्रपट स्वीकारण्यामागे काय कारण होते हे अभिषेकने लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. यावेळी त्याने त्याचे वडील म्हणजेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याविषयी देखील खूप साऱ्या गप्पा मारल्या.

this is a reason why abhishek bachchan doing manmarziyan | अभिषेक बच्चन या कारणामुळे मनमर्जियां चित्रपटाद्वारे करतोय कमबॅक 

अभिषेक बच्चन या कारणामुळे मनमर्जियां चित्रपटाद्वारे करतोय कमबॅक 

googlenewsNext

अभिषेक बच्चन गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर आहे. अभिषेक कोणत्या चित्रपटात झळकणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. पण तो आता मनमर्जियां या चित्रपटाद्वारे कमबॅक करत आहे. मनमर्जियां हा चित्रपट स्वीकारण्यामागे काय कारण होते हे अभिषेकने लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. यावेळी त्याने त्याचे वडील म्हणजेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याविषयी देखील खूप साऱ्या गप्पा मारल्या. 

आई वडील बॉलीवूड मध्ये असल्यानंतर त्यांच्या मुलांकडून देखील प्रेक्षक प्रचंड अपेक्षा ठेवतात. नकळतपणे त्यांची तुलना पालकांशी करतात. अमिताभ आणि अभिषेक यांची तुलना देखील नेहमीच केली जाते. पण अमिताभ बच्चन यांची जागा मीच काय तर बॉलीवूडमधील कोणताच अभिनेता घेऊ शकत नाही असे अभिषेक बच्चन सांगतो. अभिषेक सध्या नागपूर मध्ये दाखल झाला असून लोकमतच्या कार्यक्रमात तो मनमर्जियां या त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. या कार्यक्रमाच्या आधी त्याने लोकमतच्या प्रतिनिधीशी गप्पा मारल्या. 

अभिषेक मनमर्जियां या चित्रपटाद्वारे दोन वर्षानंतर कमबॅक करत आहे. या चित्रपटाची स्टोरी आवडल्यामुळेच त्याने हा चित्रपट स्वीकारला असे तो सांगतो.  या चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय यांनी अभिषेकला या चित्रपटाची कथा ऐकवली होती. या चित्रपटाच्या अनुभवाविषयी अभिषेक सांगतो, आनंद एल राय यांनी या चित्रपटाची कथा ऐकवल्यावर या चित्रपटाच्या कथेच्या मी प्रेमातच पडलो होतो. अनुराग कश्यप हा खूप चांगला दिग्दर्शक असून त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.

Web Title: this is a reason why abhishek bachchan doing manmarziyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.