रणबीर कपूर-संजय दत्तचा ‘शमशेरा’ थंडबस्त्यात; वाचा काय आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 11:14 AM2019-02-15T11:14:45+5:302019-02-15T11:16:25+5:30

गतवर्षी रणबीर कपूर- संजय दत्तचा मल्टिस्टारर चित्रपट ‘शमशेरा’चा लूक प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार, असे त्यावेळी सांगितले गेले होते. पण आता ‘शमशेरा’ निर्धारित वेळेत प्रदर्शित होण्याची धूसर दिसू लागलीय.

ranbir kapoor sanjay dutt starrer film shamshera comes to a standstill due to date problems | रणबीर कपूर-संजय दत्तचा ‘शमशेरा’ थंडबस्त्यात; वाचा काय आहे कारण!

रणबीर कपूर-संजय दत्तचा ‘शमशेरा’ थंडबस्त्यात; वाचा काय आहे कारण!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘शमशेरा’ या चित्रपटात रणबीरच्या अपोझिट वाणी कपूर दिसणार आहे. करण मल्होत्रा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.

गतवर्षी रणबीर कपूर- संजय दत्तचा मल्टिस्टारर चित्रपट ‘शमशेरा’चा लूक प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार, असे त्यावेळी सांगितले गेले होते. पण आता ‘शमशेरा’ निर्धारित वेळेत प्रदर्शित होण्याची धूसर दिसू लागलीय आणि याला कारण आहे, रणबीर व संजयच्या डेट्स.
होय, रणबीर कपूर सध्या आलिया भट्टसोबत ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. तर संजय दत्त आशुतोष गोवारीकरच्या ‘पानीपत’मध्ये व्यग्र आहे. त्यामुळे ‘शमशेरा’ रखडताना दिसतोय. चर्चा खरी मानाल तर, ‘शमशेरा’साठी मेकर्सनी लाखो रूपये खर्चून एक भव्य सेट उभारला होता. पण या सेटवर आत्तापर्यंत केवळ दहा दिवसांचे शूटींग झाले. तेव्हापासून हा सेट नुसता उभा आहे. या सेटचे रोजचे भाडे ४० हजार रूपयांच्या घरात आहे.

या सेटवर एक गाणे सेट करण्यात आले. त्यालाही आता पाच महिने झालेत. या पाच महिन्यात ना ‘शमशेरा’चे काम जराही पुढे सरकले नाहीत. रणबीर व संजय आपआपल्या चित्रपटात बिझी असल्याने तूर्तास तरी ‘शमशेरा’साठी त्यांच्याकडे तारखा नाहीत. साहजिकचं ‘शमशेरा’च्या निर्मात्यांना यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागतेय. आता रणबीर व संजय यांना कधी वेळ मिळतो आणि कधी चित्रपट मार्गी लागतो, ते बघूच.
‘शमशेरा’ या चित्रपटात रणबीरच्या अपोझिट वाणी कपूर दिसणार आहे. करण मल्होत्रा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. या अ‍ॅक्शनपटात संजय दत्त निगेटीव्ह रोलमध्ये असून रणबीर व संजयची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहे.

Web Title: ranbir kapoor sanjay dutt starrer film shamshera comes to a standstill due to date problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.