राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, दरवाजा बंद करून निर्माते सांगायचे टॅलेंट दाखवायला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 08:41 PM2019-05-30T20:41:11+5:302019-05-30T20:41:50+5:30

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमी वादग्रस्त विधान करून चर्चेत असते. त्यामुळेच तिला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन असे संबोधले जाते.

Rakhi Sawant's shocking disclosure, producers told show off the talent of the close door | राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, दरवाजा बंद करून निर्माते सांगायचे टॅलेंट दाखवायला

राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, दरवाजा बंद करून निर्माते सांगायचे टॅलेंट दाखवायला

googlenewsNext


बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमी वादग्रस्त विधान करून चर्चेत असते. त्यामुळेच तिला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन असे संबोधले जाते. राखी सावंतने आपल्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवली आहे. राखी एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिला कॅमेऱ्याला सामोरे कसे जायचे बरोबर माहित आहे. 


राखी गेल्या वीस वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत काम करत आहे. मात्र कमी लोकांना राखीचे खरे नाव माहित असेल. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार राखीचे खरे नाव नीरू भेडा असे आहे. चित्रपटात आल्यानंतर राखीने आपले नाव बदलून राखी सावंत असे ठेवले. राखीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 


या व्हिडिओत राखी आपल्या स्ट्रगलिंग काळाबद्दल सांगते आहे. राखी म्हणाली की, मी घरातून पळून आली होती. मी सर्व माझ्या हिमतीवर कमावले आहे. त्यावेळी माझे नाव नीरू भेडा होते. जेव्हा मी ऑडिशनसाठी जायचे तेव्हा दिग्दर्शक-निर्माते टॅलेंट दाखवायला सांगायचे. त्यावेळी अनभिज्ञ होते की ते कोणते टॅलेंट दाखवायला सांगत आहेत. मी फोटो घेऊन त्यांच्याकडे जायचे तर ते दरवाजा बंद करायचे. मी लगेच तिथून निघून जायचे. राखीने हे देखील सांगितले की तिची आई एका रुग्णालयात आयाचे काम करत होती.


राखीने पुढे सांगितले की, मी खूप गरीबी पाहिली आहे. माझी आई रुग्णालयात आया होती आणि ती तिथला कचरा गोळा करायची. आमचे खाण्याचे देखील वांदे होते. आम्ही दुसऱ्यांनी टाकलेले अन्न शोधून खायचो. 


आपला जीवन प्रवास सांगताना राखी खूप भावूक झाली होती आणि तिला रडू कोसळले होते. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Web Title: Rakhi Sawant's shocking disclosure, producers told show off the talent of the close door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.