संजय दत्तच्या आयुष्यातील या गोष्टी संजू या चित्रपटात दाखवणे निर्मात्यांनी टाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:20 PM2018-07-02T14:20:30+5:302018-07-02T14:27:26+5:30

संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी संजू या चित्रपटात काहीही दाखवण्यात का आले नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे.

Producers avoided showing Sanjay Dutt's life's some chapters in Sanju film | संजय दत्तच्या आयुष्यातील या गोष्टी संजू या चित्रपटात दाखवणे निर्मात्यांनी टाळले

संजय दत्तच्या आयुष्यातील या गोष्टी संजू या चित्रपटात दाखवणे निर्मात्यांनी टाळले

googlenewsNext

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित संजू हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून संजयच्या आयुष्याविषयी या चित्रपटात प्रेक्षकांना जाणून घ्यायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहाता संजूच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवल्या जाणार असल्याचे प्रेक्षकांना वाटत होते. पण चित्रपट पाहात असताना संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवण्यात आलेल्या नाहीत असेच वाटते. संजय दत्तच्या 350 गर्लफ्रेंड असल्याचा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये उल्लेख असला तरी चित्रपटात केवळ त्याच्या एकाच गर्लफ्रेंडचा उल्लेख करण्यात आला आहे. 
संजूच्या कमलेश या मित्राविषयी चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. पण त्याचसोबत सलमान खान, कुमार गौरव या संजयच्या अगदी जवळच्या मित्रांविषयी एकदेखील दृश्य चित्रपटात नाहीये. तसेच चित्रपटात मान्यता वगळता संजच्या दोन्ही पत्नींविषयी साधा उल्लेख देखील करण्यात आलेला नाही.  संजयला त्रिशाला नावाची मुलगी असल्याचे देखील चित्रपटात कुठेच दाखवण्यात आलेले नाही. संजयच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी चित्रपटात काहीही दाखवण्यात का आले नाही असा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडलेला आहे. पण असे असले तरीही ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रिलीजनंतरच्या दोन दिवसांत या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केलेत. केवळ दोन दिवसांत या चित्रपटाने ७३ कोटी ३५ लाखांची विक्रमी कमाई केली आहे.
अ‍ॅडव्हान्स बुकिंग आणि चित्रपटगृहांबाहेर लागलेले हाऊसफुलचे बोर्ड यावरून हा चित्रपट यंदाचा सर्वात मोठा ‘ओपनर’ ठरेल, याचा अंदाज आधीच आला होता. झालेही तसेच़ पहिल्याचं दिवशी या चित्रपटाने ३४.७५ कोटींचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने ३८.६० कोटी रूपये कमावले. पहिल्या दोन दिवसांतच ‘संजू’ने ७३.३५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
‘संजू’ने सलमान खानच्या ‘रेस3’चा सर्वात मोठा ‘ओपनर’चा विक्रम मोडीत काढला आहे. ‘संजू’ हा रणबीरच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. कारण हा चित्रपट रणबीरच्या आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.  

Web Title: Producers avoided showing Sanjay Dutt's life's some chapters in Sanju film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.