‘प्रेग्नंट’ एमी जॅक्सनचा लंडनमध्ये साखरपुडा, डान्स व्हिडीओ व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:19 PM2019-05-06T12:19:56+5:302019-05-06T12:20:30+5:30

बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे एमी जॅक्सन. एमीने यावर्षी जानेवारीत बॉयफ्रेंड जॉर्ज पानायियोटौ याच्यासोबतसोबत गुपचूप साखरपुडा उरकला होता. आता तिने मित्र आणि कुटुंबीयांसमोर पुन्हा एकदा साखरपुडा केला.

pregnant amy jackson officially engaged to boyfriend in private ceremony in london | ‘प्रेग्नंट’ एमी जॅक्सनचा लंडनमध्ये साखरपुडा, डान्स व्हिडीओ व्हायरल!!

‘प्रेग्नंट’ एमी जॅक्सनचा लंडनमध्ये साखरपुडा, डान्स व्हिडीओ व्हायरल!!

googlenewsNext
ठळक मुद्दे एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते.

बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे एमी जॅक्सन. एमीने यावर्षी जानेवारीत बॉयफ्रेंड जॉर्ज पानायियोटौ याच्यासोबतसोबत गुपचूप साखरपुडा उरकला होता. आता तिने मित्र आणि कुटुंबीयांसमोर पुन्हा एकदा साखरपुडा केला. लंडनमध्ये हा साखरपुडा पार पडला. यासाठी एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीतील एमी व जॉर्जचा एक डान्स व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.


ब्रिटीश ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमी जॅक्सनने चालू वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा केल्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. यावेळी ती दोन महिन्यांची प्रेग्नंट होती. यानंतर गत ३१ मार्चला तिने आपल्या प्रेग्नंसीची आॅफिशिअल घोषणा केली होती. ‘ ही प्रेग्नंसी अनप्लांड होती. पण आम्ही ही जबाबदारी घेण्यास तयार आहोत. आम्ही मम्मी-पापा बनण्यास उत्सुक आहोत,’असे एमीने लिहिले होते.


 बाळाला जन्म दिल्यानंतर एमी व जॉर्ज लग्न करणार आहेत. म्हणजेच, पुढील वर्षी २०२० मध्ये हे कपल लग्न करणार आहे. दोघांनीही डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीसमध्ये हे लग्न होईल, असे कळतेय. एमीचा मंगेतर  जॉर्ज हा ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्स पानायिटूचा मुलगा आहे. त्याचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लब आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.


 एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. एमीने २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर एमी  सिंग इज ब्लिंग , फ्रीकी अली. 2.0 या सिनेमांमध्ये दिसली होती.  

Web Title: pregnant amy jackson officially engaged to boyfriend in private ceremony in london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.