नाना पाटेकर 'हाउसफुल 4'मध्ये करणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 06:13 PM2018-10-10T18:13:57+5:302018-10-10T18:14:56+5:30

'हाउसफुल 4'या चित्रपटात नाना पाटेकर एका गझल गायकाची भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे.

Nana Patekar plays role in 'Housefull 4' | नाना पाटेकर 'हाउसफुल 4'मध्ये करणार ही भूमिका

नाना पाटेकर 'हाउसफुल 4'मध्ये करणार ही भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देनानांनी पुर्ण केले 'हाउसफुल 4'चे चित्रीकरण'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित

कोरियोग्राफर व निर्माती फराह खान हिने काही दिवसांपूर्वी 'हाउसफुल 4'मधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात नाना पाटेकर, कृति सेनन आणि पूजा हेगडेसह चित्रपटातील कलाकार आणि टीम मेंबर्स होते. हा चित्रपटात फूल टू कॉमेडी असणार आहे. मात्र, नानांच्या भूमिकेबाबत संपेन्स ठेवण्यात आला होता. आता 'हाउसफुल 4' मधील नानाच्या भूमिकेबाबत खुलासा करण्यात आला आहे.


'हाउसफुल 4'या चित्रपटात ते एका गझल गायकाची भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे. गेल्या आठवडयातच त्यांनी त्यांच्या हिस्साचे शूटिंग पूर्ण केले आहे. नानांची हे किरदार खूपच इंटरेस्टिंग असून त्याला विविध छटा आहेत. 'हाउसफुल 4’चे शेड्यूल पूर्ण करून नाना नुकतेच मुंबईत परतले आहेत. 'हाउसफुल 4' चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृति खरबंदा आणि चंकी पांडे हे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान यांनी केले आहे. यापूर्वी 'हाउसफुल' आणि 'हाउसफुल 2'चे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. 

'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हाउसफुल- 3’ 2016 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे. आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याचबरोबर बॉबी या कॉमेडी सिक्वेंसमध्ये कितपत परफेक्ट बसेल हे बघणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Nana Patekar plays role in 'Housefull 4'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.