अखेर रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कतरिना कैफ, ब्रेकअनंतर अशी होती तिची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 02:48 PM2019-05-30T14:48:27+5:302019-05-30T14:49:21+5:30

सध्या रणबीर आलिया भटसोबत नात्यात आहे तर कतरिना ही सिंगल आहे.

Katrina Kaif Was HEARTBROKEN; Reveals How She GOT OVER Her Break-up With Ranbir Kapoor! | अखेर रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कतरिना कैफ, ब्रेकअनंतर अशी होती तिची अवस्था

अखेर रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कतरिना कैफ, ब्रेकअनंतर अशी होती तिची अवस्था

ठळक मुद्देरणबीर आणि तिच्या ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल घडले आणि ती अनेक गोष्टींचा सखोलपणे विचार करू लागली असे तिने कबूल केले. 

अजब प्रेम की गजब कहानी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांचे सूत जुळले. ते दोघे जवळजवळ सहा वर्षं नात्यात होते. पण 2016 मध्ये त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. 

सध्या रणबीर आलिया भटसोबत नात्यात आहे तर कतरिना ही सिंगल आहे. ते दोघेही आपल्या करियरमध्ये व्यग्र असून त्या दोघांनी गेल्या काही वर्षांत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्या दोघांचे ब्रेकअप झाले असले तरी त्यांच्या नात्यात आजही कटुता नाहीये. पण या दुःखातून बाहेर पडणे कतरिनासाठी सोपे नव्हते. तिनेच ही गोष्ट मीडियात कबूल केली आहे.

भारत या चित्रपटात कतरिना मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे ती सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आणि रणबीरच्या नात्याविषयी देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत. रणबीर आणि तिच्या ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल घडले आणि ती अनेक गोष्टींचा सखोलपणे विचार करू लागली असे तिने कबूल केले. 

या मुलाखतीत तिने सांगितले की, आमचे ब्रेकअप झाल्यानंतर माझ्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. माझे आयुष्य मी कशाप्रकारे जगतेय, कशाप्रकारे जगायला पाहिजे होते याचा मी अधिक विचार करायला लागले. प्रत्येक गोष्ट ही कोणत्या ना कोणत्या कारणासाठी होत असते. मला आजही आठवतंय, बार बार देखो या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी थायलंडला जात होते. पण माझ्या डोक्यात केवळ तोच एक विचार घोळत होता. मी खूपच डिस्टर्ब होते. जे झाले ते वाईट होते हेच केवळ मला वाटत होते. 

या मुलाखतीत तिने पुढे सांगितले की, त्या काळात मी खूप जास्त वाचन केले. माणसाची मानसिकता कशी असते हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. केवळ एका रात्रीत माझा जगाकडे पाहाण्याचा आणि नात्यांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलला. माझ्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी मला माझ्यापासून दूर करायच्या होत्या. पण मला खूपच त्रास होत होता. मी एकदा योगा करत असताना अचानक रडायला लागली होती. माझ्या योगा शिक्षकाच्या देखील हे लक्षात आले होते. पण आता मी सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला शिकले आहे. 

Web Title: Katrina Kaif Was HEARTBROKEN; Reveals How She GOT OVER Her Break-up With Ranbir Kapoor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.