कंगना राणौतने मणिकर्णिकाच्या यशासाठी कुलदेवीला घातले साकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 12:19 PM2019-01-18T12:19:18+5:302019-01-18T12:45:22+5:30

कंगना राणौत सध्या आपला आगामी सिनेमा मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कंगनाचा हा सिनेमा 25 जानेवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

kangana ranaut seeks blessings at a temple in himachal for film manikarnika | कंगना राणौतने मणिकर्णिकाच्या यशासाठी कुलदेवीला घातले साकडं

कंगना राणौतने मणिकर्णिकाच्या यशासाठी कुलदेवीला घातले साकडं

googlenewsNext
ठळक मुद्देसिनेमाच्या रिलीजच्या आधी कंगनाने आपल्या कुलदेवीचे दर्शन घेतलेमणिकर्णिका हा कंगनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे

कंगना राणौत सध्या आपला आगामी सिनेमा मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कंगनाचा हा सिनेमा 25 जानेवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या आधी कंगनाने आपल्या कुलदेवीचे दर्शन घेतले. हिमाचलमधील महिषासुरमर्दनी देवळात कंगना आशीवार्द घेण्यासाठी गेली होती. यावेळी तिचे कुटुंबीयां  या दरम्यानचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. 


या फोटोंमध्ये कंगना देवळाच्या बाहेर हात जोडून प्रार्थना करताना दिसतेय. मणिकर्णिका हा कंगनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यात ती राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारते आहे. या चित्रपटाद्वारे कंगना प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवतेय. कंगनाने ४५ दिवसांपर्यंत चित्रपटाचे शूटींग सांभाळले. त्यामुळे ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ला बॉक्स ऑफिसवर किती यश मिळते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर पाहुन प्रेक्षकांना ह सिनेमा बघण्याची उत्सुकता लागली आहे. ट्रेलरमध्ये कंगनाच्या अदा, तिची तलवारबाजी, तिचा करारी बाणा, भव्य सेट सगळेच नुसते अप्रतिम आहे. अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी आणि वैभव तत्त्ववादीची मणिकर्णिकामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. मणिकर्णिका'  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

Web Title: kangana ranaut seeks blessings at a temple in himachal for film manikarnika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.