'या' सिनेमातून करणार हिमेश रेशमिया कमबॅक, बायोपिकची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:43 PM2019-04-01T16:43:45+5:302019-04-01T16:51:07+5:30

भारतीय सैन्यदलातले जवान बिष्णू श्रेष्ठा यांच्या जीवनावर आधारित आहे. अलिकडेच हिमेशने या सिनेमाचे राइट्स विकत घेतले आहेत.

Himesh Reshammiya buys the rights of the Bishnu Shrestha Biopic | 'या' सिनेमातून करणार हिमेश रेशमिया कमबॅक, बायोपिकची केली घोषणा

'या' सिनेमातून करणार हिमेश रेशमिया कमबॅक, बायोपिकची केली घोषणा

googlenewsNext

अभिनेता हिमेश रेशमिया बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर होता. मध्यंतरीच्या काळात त्याने छोट्या पडद्याचा आधार घेतला होता. काही रिअलिटी शो त्याने जज केले होते. आता त्याने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे. हिमेश एक नाही तर तब्बल चार सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यापैकी एक सिनेमा भारतीय सैन्यदलातले जवान बिष्णू श्रेष्ठा यांच्या जीवनावर आधारित आहे. अलिकडेच हिमेशने या सिनेमाचे राइट्स विकत घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच हिमेशच्या दुसरा सिनेमा 'एक्सपोज'चा सिक्वेल 'द एक्सपोज रिटर्न' असणार आहे. तर 'मैं जहाँ रहूँ' या सिनेमाचा फर्स्ट लूक त्याने नुकताच चाहत्यांसह शेअर केला आहे. 

सध्या सिनेमाच्या कथेवर काम सुरू आहे. कथा पूर्ण झाल्यावर सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात येणार आहे. हिमेश व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार सिनेमात झळकणार हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. याआधी हिमेश रेशमीया २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरा सुरूर’ सिनेमात झळकला होता. हा सिनेमा ‘आप का सुरूर’ या सिनेमाचा रिमेक होता.

गेल्या वर्षीपासून हिमेश त्याच्या प्रोफेशनल करिअरपेक्षा कमी खाजगी कारणामुळेच जास्त चर्चेत राहिला. सोनिया कपूरसह त्याने लग्न केले होते. त्याचे हे लग्नही खूप चर्चेत राहिले. दहा वर्षापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी गेल्यावर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या 16 व्या वर्षापासून हिमेशने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमापासून त्याने आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला होता. एकाच वर्षात तब्बल 36 सुपरहिट गाणी हिमेशने दिले होते.

Web Title: Himesh Reshammiya buys the rights of the Bishnu Shrestha Biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.