पहिल्यांदाच मुलांसोबत काम करणार ‘हे’ सेलेब्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 05:46 AM2018-07-29T05:46:48+5:302018-07-29T05:47:15+5:30

बॉलिवूड अशी इंडस्ट्री आहे, जिथे आपणास वेगवेगळे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळते. प्रत्येक वर्षी स्टार्स कोणत्या ना कोणत्या नव्या कलाकारांसोबत काम करत असतात.

 'Hey' Celebs to work with kids for the first time! | पहिल्यांदाच मुलांसोबत काम करणार ‘हे’ सेलेब्स!

पहिल्यांदाच मुलांसोबत काम करणार ‘हे’ सेलेब्स!

googlenewsNext

- रवींद्र मोरे

बॉलिवूड अशी इंडस्ट्री आहे, जिथे आपणास वेगवेगळे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळते. प्रत्येक वर्षी स्टार्स कोणत्या ना कोणत्या नव्या कलाकारांसोबत काम करत असतात. अशातच प्रेक्षकांचा उत्साह तेव्हा वाढतो, जेव्हा अभिनेता आपल्या मुलांसोबत किंवा आई-वडिलांसोबत पहिल्यांदाच काम करताना दिसतात. बॉलिवूडमध्ये बरेच स्टार किड्स आहेत, ज्यांचे चित्रपट प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या स्टार किड्सना त्यांच्या आई-वडिलांसोबत बघावयास मिळाले तर सोन्याहून पिवळे होईल. आगामी काळात असेच काही स्टार्स आहेत, जे आपल्या मुलांसोबत पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहेत.

सैफ अली खान-सारा अली खान
बॉलिवूडची सर्वांत प्रसिद्ध वडील आणि मुलीची जोडी म्हणजे सैफ अली खान आणि सारा अली खान होय. मीडिया रिपोर्टनुसार, सैफ आणि सारा दिग्दर्शक नितीन कक्कडच्या चित्रपटात एक काम करताना दिसू शकतात. दोघांना या चित्रपटाची आॅफर करण्यात आली होती आणि सैफने याबाबत सांगितले की, तो नितीनसोबत एका चित्रपटाविषयी बोलणे सुरू आहे, मात्र सध्या काही फायनल झाले नाही. सैफच्या हिशोबाने चित्रपटाची स्क्रिप्ट उत्कृष्ट आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट एक वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे.

अनिल कपूर- सोनम कपूर
अनिल कपूर आपली मुलगी सोनम कपूरसोबत ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. चित्रपटाचा टिझर अलीकडेच रिलीज झाला असून यात अनिल कपूर सोनमच्या वडिलांच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. हा चित्रपटही वडील आणि मुलीचे नाते आणि प्रेमावर आधारित आहे. चित्रपटात सोनम कपूर आणि राजकुमार राव एकमेकांवर प्रेम करतात, मात्र त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये खूपच अडचणी आहेत. यात अनिल कपूरच्या पत्नीची भूमिका जुही चावला साकारणार आहे आणि ही जोडी सर्वांची फेव्हरेट आहे.

सोनाक्षी-शत्रुघ्न सिन्हा
सोनाक्षी सिन्हा गतकाळातील सुपरस्टार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. बॉलिवूडची ही जोडी देखील फेमस वडील-मुलीच्या जोडींमधली एक आहे. या दोघांनी अजून एकाही चित्रपटात काम केले नाही, मात्र मीडिया रिपोर्टनुसार स्टार धर्मेंद्र यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना आपल्या आगामी 'यमला पगला दीवाना फिर से' या चित्रपटात काम करण्यासाठी विनंती केली आहे. शत्रुघ्न यांना या चित्रपटात एक लहानशी भूमिका देण्यात आली होती, मात्र नंतर भूमिका वाढवून देण्यात आली आणि या चित्रपटात सोनाक्षीदेखील कॅमियो करत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच वडील आणि मुलगी सोबत पडद्यावर दिसणार आहेत.

अनिल शर्मा -उत्कर्ष शर्मा
‘गदर’ चित्रपटाचे डायरेक्टर अनिल शर्मा आपला मुलगा उत्कर्ष शर्माला ‘जीनियस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये लॉन्च करत आहे. या चित्रपटात त्याची हिरोइन अभिनेत्री इशिता चौहान असेल. विशेष म्हणजे इशिता देखील बॉलिवूडमध्ये नवीन आहे. हा दोघांचा डेब्यू चित्रपट होय. तसा उत्कर्ष ‘गदर’ चित्रपटात चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसला होता. मात्र एक अभिनेता म्हणून वडील अनिल शर्मासोबत त्याचा हा पहिलाच चित्रपट असेल.

Web Title:  'Hey' Celebs to work with kids for the first time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.