ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये थिरकले अख्खे ‘बॉलिवूड’; पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 10:10 AM2018-12-10T10:10:25+5:302018-12-10T10:12:14+5:30

राजस्थानच्या उदयपूर येथे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच्या लग्नाचे धम्माल सेलिब्रेशन सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हजेरीने कालची रात्र आणखीच रंगली.

Gauri Khan Shah Rukh Burn Dance Floor On Dilliwali Girlfriend At Isha ambanis Sangeet | ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये थिरकले अख्खे ‘बॉलिवूड’; पाहा, व्हिडिओ!!

ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये थिरकले अख्खे ‘बॉलिवूड’; पाहा, व्हिडिओ!!

googlenewsNext
ठळक मुद्देईशा अंबानी आपला मित्र आनंद पिरामलसोबत येत्या 12 डिसेंबर रोजी आपली लग्नगाठ बांधणार आहे. आनंद आणि ईशा जुने मित्र आहेत.

राजस्थानच्या उदयपूर येथे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच्या लग्नाचे धम्माल सेलिब्रेशन सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हजेरीने कालची रात्र आणखीच रंगली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी यादरम्यान धम्माल परफॉर्मन्स दिलेत. अगदी शाहरूख खान व गौरीपासून तर ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन अशा सगळ्यांनी या रात्रीत आणखी रंग भरले.


शाहरूख व गौरी या बॉलिवूडच्या सर्वाधिक सुंदर कपलने एकत्र डान्स केला. ‘आया दिल्लीवाली गर्लफ्रेन्ड’ या बॉलिवूडच्या गाण्यावर दोघांनी ताल धरला.


ऐश्वर्या व अभिषेक हे दोघेही स्टेजवर थिरकलेत. केवळ इतकेच नाही तर शाहरूख आणि आमिर या ‘खान’ जोडीनेही यावेळी धम्माल परफॉर्मन्स दिला. दोघेही धम्माल नाचले.


हॉलिवूड स्टार बियॉन्से हिनेही ईशा अंबानीच्या लग्नात जोरदार परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्ससाठी बियॉन्सेने १५ कोटी रूपये फी घेतल्याचे कळते.
ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेरेमनीसाठी अख्खे बॉलिवूड उदयपूरमध्ये आहे. एवढेच नाही तर देश-विदेशातील प्रमुख पाहुणे देखील उदयपूरमध्ये पोहोचले आहेत. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांचेही उदरपूरमध्ये आगमन झाले आहे.

ईशा अंबानी आपला मित्र आनंद पिरामलसोबत येत्या 12 डिसेंबर रोजी आपली लग्नगाठ बांधणार आहे. आनंद आणि ईशा जुने मित्र आहेत. आनंदने महाबळेश्वरच्या मंदिरात ईशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. आनंदने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे. त्याने पेन्सिलवेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. हार्वर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने दोन स्टार्टअप सुरू केले.

Web Title: Gauri Khan Shah Rukh Burn Dance Floor On Dilliwali Girlfriend At Isha ambanis Sangeet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.