देसी गर्लची ‘आयडिया’; रिसेप्शनमध्ये फ्लिप फ्लोप चपलांमुळे नाचले सगळे पाहुणे!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:39 AM2018-12-22T11:39:38+5:302018-12-22T11:40:43+5:30

अलिकडेच तिसरी आलिशान रिसेप्शन पार्टी अलीकडेच मुंबईत पार पडली. या पार्टीसाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली, अगदी सलमान कॅटरिनापासून ते सायना नेहवालपर्यंत बॉलिवूड स्टार या पार्टीसाठी उपस्थित होते.

Desi Girl 'Idea'; All guests danced due to flip flop chapel in the reception! | देसी गर्लची ‘आयडिया’; रिसेप्शनमध्ये फ्लिप फ्लोप चपलांमुळे नाचले सगळे पाहुणे!!

देसी गर्लची ‘आयडिया’; रिसेप्शनमध्ये फ्लिप फ्लोप चपलांमुळे नाचले सगळे पाहुणे!!

googlenewsNext

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे लग्न-रिसेप्शन वेगवेगळया कारणांमुळे गाजतेय. तिने आत्तापर्यंत तीन रिसेप्शन दिले आहेत. हे तिन्ही रिसेप्शन तेवढेच ग्रँड आणि अलिशान झाल्याचे पाहायला मिळाले. अलिकडेच तिसरी आलिशान रिसेप्शन पार्टी अलीकडेच मुंबईत पार पडली. या पार्टीसाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली, अगदी सलमान कॅटरिनापासून ते सायना नेहवालपर्यंत बॉलिवूड स्टार या पार्टीसाठी उपस्थित होते. आता पार्टी म्हटल्यावर डान्स, धम्माल, मस्ती ही होणारच. म्हणून या पार्टीसाठी देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनास हिने एक शक्कल लढवली होती. तुम्हाला प्रश्न पडलाच असणार की कोणती म्हणून.. 

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या या रिसेप्शन पार्टीत डान्स फ्लोअरवर नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटणाऱ्या  पाहुण्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अनोखी शक्कल प्रियांका निकने लढवली होती. डान्स फ्लोअरवर नाचणाऱ्या  पाहुण्यासाठी त्यांनी चक्क चप्पला ठेवल्या होत्या. उंच टाचांच्या चपला घालून नाचताना सेलिब्रिटींना कोणताही त्रास होऊ नये यासाठी फ्लिप फ्लोप चप्पलांची सोय प्रियांकानं केली होती. तिची ही कल्पना सगळ्यांनाच विशेष आवडली. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पार्टीत बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध गाण्यांवर परिणीतीसह रणवीर दीपिकानंही ठेका धरला. तसेच प्रियांकानं दीपिकासोबतही डान्स करत बाजीराव मस्तानी चित्रपटाचं यशही साजरं केलं. या दोघींची प्रमुख भूमिका असलेला बाजीराव-मस्तानी २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटाची तीन वर्ष पार्टीत साजरी करत दीपिका प्रियांकाने पिंगा गाण्यावर ठेकाही धरला. डिसेंबरच्या सुरूवातीला विवाहबंधनात अडकलेल्या या दोघांनी १९ आणि २० डिसेंबर रोजी मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवलं होतं. कंगना, कॅटरिना, अनुष्का, रेखा, सलमान, रणवीर, संजय दत्त अशी अनेक बॉलिवूड मंडळी या पार्टीसाठी आली होती.

Web Title: Desi Girl 'Idea'; All guests danced due to flip flop chapel in the reception!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.