DeepVeer चे मोस्ट अवेटेड वेडिंग असले तरीही विरूष्का वेडिंगलाच नेटकऱ्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 02:32 PM2018-11-22T14:32:27+5:302018-11-22T15:11:32+5:30

विरूश्षकाच्या लग्नानंतर एक वर्षाच्या आतच दीपवीरचंही लग्न झालं. त्यामुळे कोणाचे लग्न जास्त चर्चेत राहिले याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली.

DeepVeer's Most Entertained Wedding, Veerika Wedding | DeepVeer चे मोस्ट अवेटेड वेडिंग असले तरीही विरूष्का वेडिंगलाच नेटकऱ्यांची पसंती

DeepVeer चे मोस्ट अवेटेड वेडिंग असले तरीही विरूष्का वेडिंगलाच नेटकऱ्यांची पसंती

googlenewsNext
ठळक मुद्दे दीपिका-रणवीरच्या लग्नापेक्षा अनुष्का-विराटचं लग्न सर्वाधिक लोकप्रिय आणि सोशल मीडियावरून व्हायरल झालं

विरूष्काच्या लग्नानंतर एक वर्षाच्या आतच दीपवीरचंही लग्न झालं. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं लग्न जास्त लोकप्रिय की दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्न जास्त लोकप्रिय ह्यावर मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, असं समोर आलंय की, दीपिका-रणवीरच्या लग्नापेक्षा अनुष्का-विराटचं लग्न सर्वाधिक लोकप्रिय आणि सोशल मीडियावरून व्हायरल झालं.
 
गेल्या वर्षी अनुष्का-विराटचे 11 डिसेंबरला लग्न झाले. 08 ते 14 डिसेंबर 2017 मध्ये आलेल्या आकडेवारीनुसार, ह्या दरम्यान ट्विटर, व्हायरल न्यूज़ आणि डिजिटल न्यूज रँकिंगमध्ये त्यांनी लोकप्रियतेत सर्वाधिक म्हणजेच 100 गुण मिळवले होते आणि ते नंबरवन स्थानी होते. फेसबुकवर मात्र 61 गुणांसह ही जोडी चौथ्या स्थानी होती.


 
नुकतेच 14 आणि 15 नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीरचे लग्न झाले. या आठवड्यात ट्विटर, व्हायरल न्यूज़ आणि डिजिटल न्यूजवर 100 अंकांसह ही जोडी पहिल्या स्थानी होती. तसेच फेसबुक रँकिंगमध्ये 88 गुणांसह ही जोडी दुस-या स्थानावर होती आणि न्यूजपेपर रँकिंगमध्ये 45 गुणांसह तिस-या स्थानावर होती.  
 
दोन्ही लग्नांची आकडेवारी व्यावस्थित पाहिल्यावर लक्षात येते की, विरूष्का पहिल्या स्थानावर तर दीपवीर लोकप्रियतेत दुस-या स्थानावर आहेत. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.


स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "विराटची लोकप्रियता वैश्विक आहे. ह्यामूळेच त्याच्या लग्नाची बातमी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र, वेबसाइट्स, न्यूजचॅनल्स, मनोरंजन और खेळविषयक पोर्टल्सवर झळकली. म्हणूनच दीपिका- रणवीरच्या लग्नाच्या तुलनेत विरूश्काचे लग्न जास्त लोकप्रिय ठरले."

 
अश्वनी पुढे सांगतात, “फेसबुकवर दीपिका आणि रणवीरची फॅन फॉलोविंग जास्त असल्याने विराट आणि अनुष्कापेक्षा दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची चर्चा फेसबुकवर अधिक झाली. आता लवकरच प्रियांका-नीकचे लग्न होणार आहे. हे मचअवेटेड लग्न गेमचेंजर ठरू शकते.“
 

Web Title: DeepVeer's Most Entertained Wedding, Veerika Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.