ह्या अभिनेत्रीला करायचे होते 'भारत'मध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 04:38 PM2018-08-17T16:38:51+5:302018-08-17T16:47:10+5:30

'भारत' चित्रपटात सलमान व कतरिना यांच्या व्यतिरिक्त दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

This actress wanted to work in Bharat Movie | ह्या अभिनेत्रीला करायचे होते 'भारत'मध्ये काम

ह्या अभिनेत्रीला करायचे होते 'भारत'मध्ये काम

ठळक मुद्दे'भारत' चित्रपट साउथ कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर'वर आधारीत

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट 'भारत'ची सगळीकडे खूप चर्चा रंगली आहे. या सिनेमात कतरिना कैफच्या जागी आधी अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिसणार होती. मात्र नंतर तिने हा चित्रपट करण्यास नकार दिल्यामुळे कतरिनाची वर्णी लागली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिनला या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती.

प्रियांका चोप्राने ऐनवेळी 'भारत' चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यामुळे सर्वांना तिने असे का केले असेल असा प्रश्न पडला होता. मात्र प्रियांकाला हॉलिवूडपटाची ऑफर आल्यामुळे तिने हा चित्रपट सोडला असल्याचे बोलले जात आहे. प्रियांकाने नकार दिल्यानंतर या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार याविषयी जोरदार चर्चा रंगली होती. या भूमिकेसाठी अभिनेत्री कतरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघींच्या नावाचा विचार सुरु होता. मात्र अखेर कतरिनाची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'रेस ३' चित्रपटामध्ये सलमानबरोबर जॅकलिन रुपेरी पडद्यावर झळकली होती. मात्र हा चित्रपट व त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना तितकी भावली नाही. त्यामुळे सलमानने 'भारत'साठी जॅकलिनच्या नावाला म्हणावे तसे प्राधान्य दिले नाही. विशेष म्हणजे कतरिना ही कायमच सलमानची पहिली पसंती असते. त्यामुळेच जॅकलीन ऐवजी कतरिनाची या चित्रपटासाठी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जॅकलिनला 'भारत' चित्रपटात काम करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र कतरिनाची वर्णी लागल्यामुळे ती नाराज झाली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 
'भारत' चित्रपट 2014 साली प्रदर्शित झालेला साउथ कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर'वर आधारीत आहे. 'भारत' चित्रपटाची कथा 1947 म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल.या सिनेमात सलमान व कतरिना यांच्या व्यतिरिक्त दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेड्युल मुंबईत पार पडले आहे. हा चित्रपट 2019मध्ये ईदच्या वेळी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: This actress wanted to work in Bharat Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.