न्यूयॉर्कच्या रस्त्यावर बिकिनीमध्ये अवतरली ही अभिनेत्री

By Admin | Published: March 22, 2017 07:14 PM2017-03-22T19:14:16+5:302017-03-22T19:14:16+5:30

अभिनेत्री एमिली राताकॉवस्की सध्या आपल्या आपल्या एका कॅम्पेन व्हिडिओमध्ये चर्चेत आहे.

Actress escaped with bikini on the streets of New York | न्यूयॉर्कच्या रस्त्यावर बिकिनीमध्ये अवतरली ही अभिनेत्री

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर बिकिनीमध्ये अवतरली ही अभिनेत्री

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 -  अभिनेत्री एमिली राताकॉवस्की सध्या आपल्या आपल्या एका कॅम्पेन व्हिडिओमध्ये चर्चेत आहे. DKNY  लॉन्जरी ब्रँडच्या या व्हिडिओत बिकिनी परिधान करून कुत्र्याला सोबत घेऊन फिरत असलेल्या एमिलीच्या अदा पाहून न्यूयॉर्कवासीय थक्क झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
सध्या मेक्सिकोमध्ये सुट्टीचा आनंद लुटत असलेल्या एमिलीने नुकताच इन्स्टाग्रामवर आपला न्यूड फोटो शेअर केला होता. मात्र त्या फोटोबरोबरच ट्विटरवरील एमिलीचा हा व्हिडिओ अधिकच पाहिला जातोय. जाहीरातीसाठी चित्रित करण्याता आलेल्या या व्हिडिओत एमिली सकाळी सकाळीच बिकिनी परिधान करून न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरायला निघाली आहे. 
त्यावेळी एमिलीला पाहणाऱे तिला पाहून जागच्या जागीच थांबल्याचे दिसत आहेत. तिला पाहून एक आजोबा जागच्या जागीच थांबले आहेत, तर आजीबाईं  मात्र एमिलीचा पेहराव पसंत नसल्याने नाक मुरडत आहेत. दरम्यान एका तरुणाला ती धक्का देते, तो तरुणही एमिलीकडे पाहत राहतो. तर एका ड्रायव्हरचा अपघात होता होता वाचतो. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत एमिली रस्त्यावरून फिरत राहते.  
 

Web Title: Actress escaped with bikini on the streets of New York

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.