एका अमराठी माणसाने प्रचंड अभ्यास करून..; मराठमोळ्या अभिनेत्याची 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून प्रतिक्रिया चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:20 AM2024-03-27T09:20:55+5:302024-03-27T09:21:56+5:30

 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून राधा ही बावरी फेम मराठमोळा अभिनेता सोरभ गोखलेने त्याची जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. काय म्हणााला सौरभ बघा

actor saurabh gokhale post for swatantryaveer savarkar actor randeep hooda | एका अमराठी माणसाने प्रचंड अभ्यास करून..; मराठमोळ्या अभिनेत्याची 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून प्रतिक्रिया चर्चेत

एका अमराठी माणसाने प्रचंड अभ्यास करून..; मराठमोळ्या अभिनेत्याची 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून प्रतिक्रिया चर्चेत

रणदीप हूडाची प्रमुख भूमिका असलेला  'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय.  'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर १० कोटीहून अधिकचा गल्ला जमावला आहे. रणदीपच्या या सिनेमावर लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिंदी-मराठी मनोरंजन विश्वातील अनेत अभिनेते  'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं कौतुक करत आहेत. अशातच  'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून मराठमोळा अभिनेता सौरभ गौखलेने त्याचं मत मांडलंय. 

सौरभने सोशल मीडियावर  'स्वातंत्र्यवीर सावरकर'चं पोस्टर शेअर करुन लिहीलंय की, "रणदीप हुडा या माणसाच्या डेडिकेशनला सलाम आहे.. साक्षात याने तात्याराव समोर उभे केलेत.. हि व्यक्तिरेखा तो जगलाय.. वीर सावरकरांचं संपूर्ण आयुष्य आणि कार्य 2 तासात दाखवणं हे केवळ अशक्य आहे. आणि आत्ताची पिढी या व्यक्तिमत्वापासून ठरवून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असण्याच्या काळात एका अमराठी माणसानी प्रचंड अभ्यास करून हि व्यक्तिरेखा लोकांसमोर उभ करणं हे अत्यंत धाडसाचं आणि अभिमानास्पद कार्य !! नतमस्तक !! अमित सियाल , राजेश खेरा, अंकिता लोखंडे आणि इतर सर्वांची कामेही अप्रतिम !! न चुकता हा चित्रपट प्रत्येकाने बघा !!"

सौरभच्या या पोस्टवर अनेकांनी त्याचं समर्थन केलंय. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. चार दिवसात 'स्वातंत्र्यवीर सावरकर'  सिनेमाने १० कोटींचा आकडा पार केलाय. पहिल्या दिवशी १ कोटी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी सिनेमाने २ कोटींहून जास्त व्यवसाय केलाय. त्यामुळे चार दिवसांची कमाई बघता 'स्वातंत्र्यवीर सावरकर'  सिनेमाने १०.९६ म्हणजेच जवळपास ११ कोटी कमावले आहेत. 

Web Title: actor saurabh gokhale post for swatantryaveer savarkar actor randeep hooda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.