Fact Check: अल्लू अर्जुनने केला काँग्रेसचा प्रचार?; खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल, असं समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 08:45 PM2024-04-22T20:45:56+5:302024-04-22T20:51:48+5:30

अभिनेता अल्लू अर्जुन याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आला आहे.

Allu Arjun campaigned for Congress The truth behind viral video with false claims | Fact Check: अल्लू अर्जुनने केला काँग्रेसचा प्रचार?; खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल, असं समोर आलं सत्य

Fact Check: अल्लू अर्जुनने केला काँग्रेसचा प्रचार?; खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल, असं समोर आलं सत्य

Created By: Boom 
Translated By : ऑनलाइन लोकमत

देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना सोशल मीडियावर दिशाभूल करणारे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत. दक्षिण भारतातील सुपरस्टार अशी ओळख असणारा अभिनेता अल्लू अर्जुन याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आला आहे. मात्र आम्ही केलेल्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचं आढळून आलं आहे. 

अल्लू अर्जुनचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा ऑगस्ट २०२२ मध्ये न्यूयॉर्क इथं आयोजित "इंडिया डे परेड"मधील आहे. या व्हिडिओचा देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांशी कसलाही संबंध नाही. 

देशात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमधील १०२ जागांसाठी मतदान झालं आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी घोषित होणार आहे. अशातच या निवडणुकीशी संबंध जोडून अल्लू अर्जुनचा व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे. "काँग्रेसच्या सन्मानासाठी...अल्लू अर्जुन मैदानात," अशा कॅप्शनसह एका यूजरने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

एक्सवर बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेल्या कमाल आर खान यानेही खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला आहे. "भारताचा सगळ्यात मोठा स्टार अल्लू अर्जुन हा काँग्रेससाठी प्रचार करत आहे," असं कमाल आर खानने म्हटलं आहे.

फॅक्ट चेक

सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या कीफ्रेमला रिव्हर्स इमेज सर्च केले. याद्वारे आम्ही तेलंगणा टुडेच्या एका वृत्तापर्यंत पोहोचलो. २२ ऑगस्ट २०२२ च्या या वृत्तामध्ये व्हायरल व्हिडिओशी मिळता-जुळता फोटो दिसून येत आहे. "भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्क येथील इंडिया डे परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या परेडमध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुन ग्रँड मार्शल होता," असं या वृत्तात म्हटलं आहे.

यानंतर आम्ही या परेडशी संबंधित कीवर्ड्स गुगलवर सर्च केले. त्यानंतर आम्हाला २२ ऑगस्ट २०२२ रोजीचे अमर उजाला आणि दैनिक भास्कर या वृत्तपत्रांतील वृत्त आढळून आले. या वृत्तांमध्येही स्पष्ट करण्यात आलं होतं की, भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्क इथं आयोजित इंडिया डे परेडमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओ आणि अल्लू अर्जुनच्या यू ट्यूब चॅनलवर आढळलेल्या जुन्या व्हिडिओच्या स्क्रीनशॉटची खाली तुलना करण्यात आली आहे. यामध्ये स्पष्ट होत आहे की, अल्लू अर्जुनचे कपडे आणि इतर गोष्टी समान आहेत. यातून सध्या अल्लू अर्जुनबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे.

सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.

Web Title: Allu Arjun campaigned for Congress The truth behind viral video with false claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.