किंग ऑफ तेलगु सिनेमा असं बिरूद अभिनेता नागार्जुनला लावलं जातं. सुरूवातील काही बॉलिवूड सिनेमातही नागार्जूनने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. पण त्यानंतर तो केवळ साऊथ सिनेमात दिसला. पण आज तेलगु सिनेमातील तो सर्वात मोठा स्टार आहे. अर्थातच त्याची लाइफस्टाइलही नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. साऊथमधील असे अनेक स्टार्स आहेत ज्यांची लाइफस्टाइल ही बॉलिवूड अभिनेत्यांना लाजवेल अशी आहे. त्यात नागार्जुनचाही समावेश आहे. 

(Image Credit : FilmiBeat)

तेलगु सिनेमात काम करण्यासोबतच नागार्जून कन्स्ट्रक्शन कंपनीचा बिझनेसही आहे. त्यानुसार आजच्या तारखेला या स्टारची एकूण संपत्ती तब्बल ८५० कोटी रूपयांची असल्याची माहिती आहे. म्हणजे वर्षाला तो ३० कोटी रूपयांची कमाई करतो. अर्थातच त्याची लाइफस्टाइलही किंग साइज असणार. 

(Image Credit : news.indianservers.com)

नागार्जुनकडे काही फारच महागड्या वस्तू आहेत. म्हणजे सर्वसामान्य माणूस या वस्तूंचं साधं स्वप्नही बघू शकत नाहीत. लक्झरी कारपासून ते आलिशान बंगलो, अशा त्याच्याकडे असलेल्या ५ सर्वात महागड्या वस्तू काय आहेत हे जाणून घेऊ. 

१) Range Rover Evoque –  

या कारची किंमत ६५ लाख रूपये इतकी आहे.

२) Audi A7 –

या कारची किंमत १.०२ कोटी रूपये इतकी आहे.

३) BMW 7 series –

ही कार सुद्धा कोट्यवधीची असून या कारची किंमत १.३२ कोटी रूपये आहे.

४) Mercedes S-Class –  

(Image Credit : CAR Magazine)

ही त्याच्या कार कलेक्शनमधील सर्वात महागडी कार आहे. या कारची किंमत ३ कोटी रूपये आहे.

५) आलिशान बंगला

नागार्जुनकडे असलेली आणखी एक सर्वात महागडी वस्तू म्हणजे त्याचा आलिशान बंगला. हैद्राबादच्या फिल्म नगरमध्ये असलेल्या या बंगल्याची किंमत तब्बल ४२.३ कोटी रूपये इतकी आहे. 


Web Title: South Superstar Nagarjuna owns 5 expensive things, Know his lifestyle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.