सोफिया हयात अडकली विवाहबंधनात
By Admin | Updated: April 25, 2017 20:08 IST2017-04-25T20:08:51+5:302017-04-25T20:08:51+5:30
सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी मॉडेलिंगनंतर नन बनलेली सोफिया हयात आणि तिचा प्रियकर व्लाद स्टानेस्कु सोमवारी (दि.24) विवाहबंधनात अडकले.

सोफिया हयात अडकली विवाहबंधनात
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी मॉडेलिंगनंतर नन बनलेली सोफिया हयात आणि तिचा प्रियकर व्लाद स्टानेस्कु सोमवारी (दि.24) विवाहबंधनात अडकले.
सोफिया हयात हिने तिच्या विवाहाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आहेत. सोफिया आणि व्लाद स्टानेस्कु यांचा विवाहसोहळा इजिप्शियन पद्धतीनुसार पार पडला. या विवाहसोहळ्याचे फोटो त्यांच्या मित्रांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये सोफिया एखाद्या राजकन्येप्रमाणे दिसत असून तिने सोनेरी कलरचा गाऊन परिधान केला आहे. तर, व्लाद स्टानेस्कु याने क्रीम कलरची शेरवानी परिधान केली आहे. त्याचा हा आगळावेगळा विवाहसोहळा पाहण्याजोगा होता. दरम्यान, सोफियाला तिच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी सोफियाने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने आपल्या होणा-या पतीबद्दल माहिती दिली होती. तसेच, लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे जाहीर केले होते.
(फोटो साभार - इन्स्टाग्राम)