महेश बाबू म्हणजे तेलगू फिल्म इंडस्ट्रिमधील सर्वात मोठं नाव. महेश बाबू याला साऊथ सिने इंडस्ट्रीचा शाहरुख खान असंही म्हटलं जातं. असं असलं तरी, महेश बाबू काही बाबतीत किंग खानलाही मागे टाकतो. मग याचे फॅन्स असो किंवा लाइफ स्टाइल. फक्त किंग खानच नाही तर बॉलिवूडच्या खानांनसह इतर बड्या सेलिब्रिटींनाही महेश बाबू मागे टाकतो. 

तेलगू सिनेमांचा सुपरस्टार महेश बाबू याचे वडिल कृष्णा हे अभिनेते तर आई इंदिरा या अभिनेत्री होत्या. लहानपणापासूनच अभिनयाचे संस्कार झालेल्या महेश बाबूने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षांपासूनच सिनेमात काम करणं सुरु केलं. वडिलांच्या सांगण्यावरून अभिनय क्षेत्राकडे वळणारा महेश बाबू फक्त तरूणींच्याच नाही तर लाखो तरूणांच्याही गळ्यातील ताईत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 1999मध्ये प्रर्दर्शित झालेल्या 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून महेश बाबूने अभिनेत्री प्रिती झींटासोबत स्क्रिन शेअर करत आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. सध्याच्या काळात महेश बाबू सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबू एका चित्रपटासाठी जवळपास 20 कोटी रूपये मानधन घेतो. जे अनेक बॉलिवूड कलाकारांच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त आहेत. 

2005मध्ये महेश बाबूने मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत. महेश बाबू आपल्या कुटुंबियांसह हैदराबादमधील आपल्या आलिशान बंगल्यामध्ये राहतो. महेश बाबूचा या बंगल्यामध्ये ड्रॉइंग रूम, डाइनिंग रूम, स्टडी रूमसह अनेक गोष्टी आहेत. 

महेश बाबूंना कारचा फार शौक असून त्याच्याकडे अनेक महागड्या कार्सचे कलेक्शन आहे. त्यामध्ये Lamborghini Gallardo (3 कोटी रुपये), Range Rover Vogue (1.6 कोटी रुपये), Toyota Land Cruiser (1.25 कोटी रुपये), Mercedes Benz E class (49 लाख रुपये), Audi A 8 (1.30 कोटी रुपये) यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. 

एवढचं नाही तर महेश बाबूकडे स्वतःची कस्टमाइज वॅनिटी व्हॅन असून तिचं नाव कारवां ठेवण्यात आलं आहे. 2013मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या 'सीतम्मा वकितलो सिरिमले चेत्तु' या चित्रपटादरम्यान त्याने ही वॅन खरेदी केली होती. महेश बाबूच्या या कस्टमाइज वॅनिटी व्हॅनमध्ये अनेक अद्ययावत सुविधा असून त्याचबरोबर ही त्याची चालती फिरती ग्रीन रूमच आहे. 

दरम्यान, कटरिना कैफ तेलगू इंडस्ट्रिमध्ये पदार्पण करणार असून ती महेश बाबूसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. परंतु कटरिनाने एका इंटरव्यूमध्ये या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आपण सध्या भारत चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असून त्यानंतर आपण कोणताच चित्रपट साइन केला नसल्याचे सांगितले. 

पाहूयात महेश बाबूचे काही डॅशिंग फोटो :


Web Title: Ridiculously expensive things mahesh babu owns see photos net worth income
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.