दिशा पटानी ला लागली मोठी लॉटरी, सलमानच्या या सिनेमात झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 17:03 IST2018-05-17T16:59:01+5:302018-05-17T17:03:08+5:30

'बाजी 2' या सिनेमानंतर आता दिशाला मोठा सिनेमा मिळाला आहे. दिशा आता सलमान खानच्या आगामी सिनेमाक झळकणार आहे. 

Disha Patani joins Salman Khan movie Bharat directed by Ali Abbas Zafar | दिशा पटानी ला लागली मोठी लॉटरी, सलमानच्या या सिनेमात झळकणार

दिशा पटानी ला लागली मोठी लॉटरी, सलमानच्या या सिनेमात झळकणार

मुंबई : अभिनेत्री आणि टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानीचे भाव सध्या चांगलेच वाढले आहे. 'बाजी 2' या सिनेमानंतर आता दिशाला मोठा सिनेमा मिळाला आहे. दिशा आता सलमान खानच्या आगामी सिनेमाक झळकणार आहे. 



 

दिशा पटानी सलमान खानच्या आगामी भारत या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 2019 ईदला हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास यांनी ट्विट करुन याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करुन दिशाचं स्वागत केलंय. नंतर सलमान खान यानेही दिशाचा फोटो ट्विटरवर शेअर करत तिचं स्वागत केलंय.




 

या सिनेमात मुख्य अभिनेत्रीची भूमिका प्रियंका चोप्रा साकारणार आहे. तब्बल 10 वर्षांनंतर सलमान खान आणि प्रियंका चोप्रा एकत्र काम करणार आहेत. आता दिशा पटानी सुद्धा या सिनेमात असल्याने आणखीन धमाल येणार आहे. 
 

Web Title: Disha Patani joins Salman Khan movie Bharat directed by Ali Abbas Zafar