अबब..असिनची वेडिंग रिंग ६ कोटींची!
By Admin | Updated: January 1, 2016 21:59 IST2016-01-01T21:50:38+5:302016-01-01T21:59:33+5:30
बॉलीवूड अभीनेत्री असिन लवकरच लगनाच्या बेडीत अडकनार आहे, ती तिचा बॉयफ्रेंड बिझनेसमॅन राहुल शर्मासोबत पुढील महिन्यात लग्न करणार आहे.

अबब..असिनची वेडिंग रिंग ६ कोटींची!
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - बॉलीवूड अभीनेत्री असिन लवकरच लगनाच्या बेडीत अडकनार आहे, ती तिचा बॉयफ्रेंड बिझनेसमॅन राहुल शर्मासोबत पुढील महिन्यात लग्न करणार आहे. मागील काही दिवसात तिचा साखरपुडा संपन्न झाला, असिनची वेडिंग रिंग तब्बल कोटी रुपयांची असल्याच समोर आले आहे. नुकतच असिन आणि तिच्या भावी पतीस २७ डिसेंबर रोजी सलमान खानच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त पाहिले गेले, त्यावेळी असिनच्या हातातील रिंग प्रकाशझातात आली. तिच्या हातातील अंगठीची किंसत ऐकुन सर्वसामान्यास घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. मध्यंतरी तिच्या शाही लग्नपत्रिकेवरुन ती प्रकाशझोतात आली होती. यावरुन लग्नाची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं दिसते आहे, वेडिंग कार्ड्सचे वाटप पाहुण्यांकडे केंव्हाच सुरू झाले आहे. आता हे लग्न किती ग्रँड असणार याची कल्पना यायला हरकत नाही!
असिन मुळातच दक्षिणात्य अभिनेत्री आहे. सोजवळ असा चेहरा असणाऱ्या या अभिनेत्रीला बॉलीवूड मध्ये फारशा जम बसवता आला नाही, तिने केलेल्या चित्रपटापैकी गजनी, रेड्डी आणि बोलबच्चन सोडता बाकिच्या चित्रपटानी तिकिट खिडकीवर असिनला नाराज केले आहे.