लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:27 PM2019-04-02T12:27:32+5:302019-04-02T12:28:16+5:30

अधिसूचना प्रसिद्ध : गुढीपाडव्यानंतर शेवटच्या दोन दिवसांत भाजप व कॉँग्रेसचे उमेदवार अर्ज दाखल करणार

Loksabha election rally | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आजपासून

dhule

Next

धुळे : लोकसभा निवडणुकीसाठी धुळे लोकसभा मतदारसंघासाठीची रणधुमाळी मंगळवार, २ एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यासंदर्भात अधिसूचना मंगळवारी २ रोजी जारी होत आहे. निवडणुकीच्या मैदानात असलेले उमेदवार आपला उमेदवारी अर्ज गुरुवारपासून दाखल करू शकतील. निवडणुकीतील कॉँग्रेस व भाजपा या प्रमुख पक्षांचे उमेदवार गुढीपाडवा सणानंतर शेवटच्या दोन दिवसांत आपले उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
प्रशासनाची जय्यत तयारी
या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्याकडेच सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यांच्या दालनाबाहेर तसे फलकही लागले आहेत. तर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ निहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच विविध पथकांची जबाबदारी तहसीलदारांकडे आहे.
२५ हजार रुपये अनामत
निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना उमेदवारास त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपशील तसेच शपथपत्राद्वारे सांपत्तिक स्थितीची माहितीही सादर करावी लागणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार असल्यास त्याला रोखीने २५ हजार रुपये अनामत तर राखीव प्रवर्गातील व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यास त्याला रोखीने १२ हजार ५०० रूपये व त्याबरोबर जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
निवडणुकीसाठी स्वतंत्र बॅँक खाते नव्याने उघडणे बंधनकारक असून पासबुकाची झेरॉक्स प्रत उमेदवारी अर्जासोबत जोडावी लागणार आहे.

Web Title: Loksabha election rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.