RRvCSK, IPL 2018 : बटलरची ‘जोश’पूर्ण खेळी, राजस्थानचा चेन्नईवर विजय

शुक्रवारी जयपूरमध्ये पाहायला मिळाली ती ' बटलरशाही'. जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला चेन्नई सुपर किंग्जवर रोमहर्षक लढतीत विजय मिळवता आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 07:54 PM2018-05-11T19:54:57+5:302018-05-11T23:57:21+5:30

whatsapp join usJoin us
RRVCSK, IPL 2018 LIVE: Do not miss this celebration of Rajasthan team ... see this special video | RRvCSK, IPL 2018 : बटलरची ‘जोश’पूर्ण खेळी, राजस्थानचा चेन्नईवर विजय

RRvCSK, IPL 2018 : बटलरची ‘जोश’पूर्ण खेळी, राजस्थानचा चेन्नईवर विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देबटलरने 60 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 95 धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

जयपूर : बटलरने केलेल्या ‘जोश’पूर्ण खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर एक चेंडू आणि चार गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबतच राजस्थान रॉयल्सने आपल्या प्लेआॅफच्या आशा कायम राखल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जने दिलेले १७७ धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्सने सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. बटलर याने ६० चेंडूत ९५ धावा केल्या.
येथील सवाई मानसिंग स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सविरोधात ४ बाद १७६ धावा केल्या होत्या. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानच्या जोश बटलर याने संपूर्ण संघाची जबाबदारी घेत खेळ केला. त्याने बेन स्टोंक्स याच्यासोबत चार षटकांत ४८ धावांची भागीदारी केली. त्यात स्टोंक्सचा वाटा फक्त ११ धावांचा होता. हरभजन सिंगच्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर हरभजनने त्याला बाद केले. त्यानंतर राजस्थानचा डाव ढेपाळला. कर्णधार रहाणेचा खराब फॉर्म कायम राहिला. तर संजू सॅमसन याने २१ धावा केल्या. चोप्राही स्वस्तात परतला. मात्र बिन्नी याने २२ धावांची संयमी खेळी केली तर कृष्णप्पा गौतम याने चार चेंडूत दोन षटकार ठोकले. अखेरच्या षटकांत १२ धावांची गरज असताना चेन्नईच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा बटलरला मिळाला. उंच उडालेला झेल टिपण्यासाठी एकही क्षेत्ररक्षक पुढे आला नाही. चेन्नईच्या डेविड विली, हरभजन सिंह, जाडेजा, ठाकूर आणि ब्रावो यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पर्वी चेन्नईने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. सुरेश रैना (५१ धावा) आणि शेन वॉटसन (३९ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने २० षटकांत चार बाद १७६ धावा केल्या. अंबाती रायुडू स्वस्तात बाद झाल्यानंतर वॉटसन (३१ चेडूत ३९ धावा) आणि रैना यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी केली. त्यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांना हैराण केले.
रैना आणि वॉटसन बाद झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी याने २३ चेंडूत ३३ धावा केल्या. तर सॅम बिलिंग्ज याने २२ चेंडूत २७ धावांची खेळी केली. राजस्थानच्या जोफ्रा आर्चर याने दोन तर ईश सोढी याने एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - चेन्नई सुपर किंग्ज २० षटकांत ४ बाद १७६ धावा (वॉटसन ३९, सुरेश रैना ५२, महेंद्रसिंह धोनी नाबाद ३३, बिलिंग्ज २७ गोलंदाजी : आर्चर २/४२, ईश सोढी १/२९) राजस्थान रॉयल्स २० षटकांत ६ बाद १७७ धावा ( जोश बटलर नाबाद ९५, संजू सॅमसन २१, स्टुअर्ट बिन्नी २२, गौतम १३ गोलंदाजी : ठाकूर १/२२, हरभजन सिंह १/२९)

 

राजस्थानच्या विजयाचे सेलिब्रेशन कसे झाले ते या व्हीडीओमध्ये पाहा...



 

' बटलरशाही'; जोसच्या खेळीच्या जोरावर राजस्थानचा चेन्नईवर विजय

जयपूर : शुक्रवारी जयपूरमध्ये पाहायला मिळाली ती ' बटलरशाही'. जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला चेन्नई सुपर किंग्जवर रोमहर्षक लढतीत चार विकेेट्स राखून विजय मिळवता आला. सुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बटलरने 60 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 95 धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

11.43 PM : राजस्थानचा चेन्नईवर चार विकेट्स राखून विजय

11.42 PM : राजस्थानला विजयासाठी 2 चेंडूंत 2 धावांची गरज; बटलरचा चौथ्या चेंडूवर षटकार

11.42 PM : राजस्थानला विजयासाठी 3 चेंडूंत 8 धावांची गरज

11.42 PM : राजस्थानला विजयासाठी 4 चेंडूंत 10 धावांची गरज

11.41 PM : राजस्थानला विजयासाठी 5 चेंडूंत 12 धावांची गरज

11.38 : राजस्थानला विजयासाठी 6 चेंडूंत 12 धावांची गरज; कृष्णप्पा गौतम 13 धावांवर बाद

11.32 PM : राजस्थानला विजयासाठी 12 चेंडूंत 28 धावांची गरज

11.31 PM : राजस्थानला पाचवा धक्का; स्टुअर्ट बिन्नी बाद

- ड्वेन ब्राव्होने बिन्नीला बाद करत राजस्थानला पाचवा धक्का दिला. बिन्नीला 22 धावा करता आल्या.

11.25 PM : राजस्थानला विजयासाठी 18 चेंडूंत 38 धावांची गरज

11.15 PM : राजस्थानला विजयासाठी 30 चेंडूंत 55 धावांची गरज

11.03 PM : राजस्थानला चौथा धक्का; प्रशांत चोप्रा बाद

- शार्दुल ठाकूरला मोठा फटका मारण्याच्या नादात प्रशांत बाद झाला. प्रशांतने दोन चौकारांच्या मदतीने 8 धावा केल्या.

22.55 PM : संजू सॅमसन बाद; राजस्थानला तिसरा धक्का

'विसलपोडू' एक्सप्रेसने असा साजरा केला राजस्थानच्या विकेट्सचा आनंद... पाहा व्हीडीओ



 

10.33 PM : जोस बटलरचे 26 चेंडूंत अर्धशतक

- राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने 26 चेंडूंत अर्धशतक झळकावले. बटलरने आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर अर्धशतक पूर्ण केले.

चेन्नईची युवा 'विसलपोडू' सेना पाहा...



 

10.21 PM : अजिंक्य रहाणे बाद; राजस्थानला दुसरा धक्का

- रवींद्र जडेजाने कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. रहाणेला चार धावांवरच समाधान मानावे लागले.

22.16 PM : राजस्थानला पहिला धक्का; बेन स्टोक्स बाद

- हरभजन सिंगने बेन स्टोक्सला त्रिफळाचीत करत राजस्थानला पहिला धक्का दिला. बाद होण्यापूर्वीच्या दोन चेंडूंवर स्टोक्सने अनुक्रमे चौकार आणि षटकार लगावला होता.

रैनाचे अर्धशतक; चेन्नईच्या 176 धावा

जयपूर : सुरेश रैनाचे अर्धशतक आणि त्याला अन्य फलंदाजांनी दिलेल्या सुयोग्य साथीमुळे चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजी करताना 176 धावा करता आल्या. रैनाने 35 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 52 धावा केल्या. शेन वॉटसन (39), महेंद्रसिंग धोनी (नाबाद 33) आणि सॅम बिलिग्स (27) यांच्या उपयुक्त योगदानांमुळे चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

9.44 PM : चेन्नईचे राजस्थानपुढे 177 धावांचे आव्हान

कॅप्टन कूल धोनीची सपोर्ट सिस्टम... पत्नी साक्षी व मुलगी झिवाचा अफलातून फोटो पाहा...



 

9.18 PM : चेन्नई 15 षटकांत 3 बाद 127

9.08 PM : सुरेश रैना OUT; चेन्नईला तिसरा धक्का

- राजस्थानचा फिरकीपटू इश सोधीने रैनाला बाद करत चेन्नईला तिसरा धक्का दिला. रैनाने 35 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 52 धावा केल्या.

9.02 PM : सुरेश रैनाचे 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण

- रैनाने दमदार फलंदाजी करत 32 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकामध्ये सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

8.59 PM : शेन वॉटसन OUT; चेन्नईला दुसरा धक्का

- राजस्थानचा वेगवान गोलंदाज जेफ्रो आर्चरने वॉटसनला बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला. वॉटसनने 31 चेंडूंत प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांच्या जोडावर 39 धावा केल्या.

राजस्थानने गुलाबी रंगाचा ड्रेस का परीधान केला... पाहा रॉयल्सचेच हे ट्विट



 

8.48 PM : चेन्नई दहा षटकांत 1 बाद 90

8.40 PM : चेन्नईच्या शेन वॉटसनचा दिमाखदार षटकार

- राजस्थानचा फिरकीपटू इश सोधीच्या नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वॉटसनने दमदार षटकार लगावला.

जयपूरमध्येही पोहोचली चेन्नईची ' विसलपोडू ' आर्मी... पाहा फोटो आणि व्हीडीओ



 



 

8.19 PM : चेन्नई पाच षटकांत 1 बाद 49

8.07 PM : अंबाती रायुडू OUT; चेन्नईला पहिला धक्का

- जेफ्रो आर्चरने तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रायुडूला त्रिफळाचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. रायुडूने दोन षटकारांच्या जोरावर 12 धावा केल्या.

राजस्थानच्या संघाचा हा सोहळा चुकवू नका... पाहा हा खास व्हीडीओ



 

7.30 PM : चेन्नईचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय



 

राजस्थानला पाचव्या स्थानी जाण्याची संधी; चेन्नईविरुद्ध आज सामना

जयपूर : आयपीएलमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा आज सामना करावा लागणार आहे तो राजस्थान रॉयल्सला. राजस्थानने आतापर्यंत दहा सामन्यांत चार विजय मिळवले आहेत. त्यामुळे ते सध्याच्या घडीला सहाव्या स्थानावर आहोत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून ते पाचव्या स्थानावर पोहचू शकतात आणि स्पर्धेतील आपले आव्हान जीवंत ठेवू शकतात. पण त्यांचा पराभव झाला तर पुढचा प्रवास कठिण होऊ शकतो. दुसरीकडे चेन्नईचा संघ या सामन्यात विजयी ठरला तर त्यांचे 16 गुण होतील आणि बाद फेरीच्या दिशेने त्यांचे हे ठोस पाऊल असेल.

 

दोन्ही संघ 



 



 

दोन्ही संघांचे स्टेडियममध्ये आगमन... पाहा हा व्हीडीओ



 

Web Title: RRVCSK, IPL 2018 LIVE: Do not miss this celebration of Rajasthan team ... see this special video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.