मध्य प्रदेशच्या रोहेराचा विश्वविक्रम; रणजी पदार्पणात नाबाद २६७ धावा

या खेळीमुळे अजय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू बनला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 03:36 AM2018-12-09T03:36:48+5:302018-12-09T03:37:12+5:30

whatsapp join usJoin us
Rohrer's record of Madhya Pradesh; Ranji debut was unbeaten 267 runs | मध्य प्रदेशच्या रोहेराचा विश्वविक्रम; रणजी पदार्पणात नाबाद २६७ धावा

मध्य प्रदेशच्या रोहेराचा विश्वविक्रम; रणजी पदार्पणात नाबाद २६७ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंदौर : मध्य प्रदेशचा सलामीचा फलंदाज अजय रोहेरा याने शनिवारी हैदराबादविरुद्धच्या रणजी सामन्यात पदार्पणात नाबाद २६७ धावांची खेळी करीत विश्वविक्रम नोंदविला.

अजय या खेळीमुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबईच्या अमोल मुजुमदार याच्या नावावर होता. अमोलने १९९४ मध्ये पदार्पणात हरियाणाविरुद्ध २६० धावा केल्या होत्या. मुजुमदारने अजयचे अभिनंदन केले आहे. अजयने या खेळीदरम्यान ३४५ चेंडूंचा सामना केला. त्याने २१ चौकार व पाच षट्कारांच्या साह्याने आपली खेळी सजविली. या खेळीच्या जोरावरच मध्य प्रदेशने हैदराबादविरुद्ध चार बाद ५६२ धावांचा डोंगर उभा केला. मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी हैदराबादचा दुसरा डाव १८५ धावांत गुंडाळत संघाला १ डाव २५३ धावांनी विजय मिळवून दिला.

Web Title: Rohrer's record of Madhya Pradesh; Ranji debut was unbeaten 267 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.