RCB vs RR, IPL 2018 LIVE : घरच्या मैदानात बंगळुरु पराभूत; राजस्थानचा 19 धावांनी विजय

रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर घोंघावले ते संजू सॅमसम नावाचे वादळ आणि या वादळापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा आपल्या घरच्या मैदानातच पालापाचोळा झाला. संजूने एकामागून एक फटक्यांची माळ लावत फक्त 45 चेंडूंत 2 चौकार आणि 10 षटकारांच्या जोरावर नाबाद 92 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 04:12 PM2018-04-15T16:12:24+5:302018-04-15T19:47:39+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs RR, IPL 2018 LIVE : Ajinkya Rahane's first four for RajasthanLIVE | RCB vs RR, IPL 2018 LIVE : घरच्या मैदानात बंगळुरु पराभूत; राजस्थानचा 19 धावांनी विजय

RCB vs RR, IPL 2018 LIVE : घरच्या मैदानात बंगळुरु पराभूत; राजस्थानचा 19 धावांनी विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसंजू सॅमसन हा राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

बंगळुरु : संजू सॅमसन हा राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूच्या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने यंदाच्या हंगामातील 217 ही सर्वोच्च धावसंख्या गाठता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने कडवी झुंज दिली, पण बंगळुरुला अखेर राजस्थानकडून 19 धावांनी पराभव पत्करावा लागला. राजस्थानचा हा दुसरा विजय ठरला.

राजस्थानच्या 218 धावांचा पाठलाग करताना बंगळुरुची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांना डावाच्या चौथ्याच चेंडूवर पहिला धक्का बसला. त्यानंतर कोहली आणि डी'कॉक यांनी दमदार फलंदाजी करत दहाच्या धावगतीने बंगळुरुचा धावफलक पळता ठेवला. पण आठव्या षटकात डी'कॉक बाद झाला आणि त्यानंतर बंगळुरुच्या डावाची पडझड सुरु झाली. डी'कॉक आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली होती. डी'कॉक बाद झाल्यावर कोहलीने आपली फटकेबाजी सुरु ठेवत 26 चेंडूंत अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर त्याला फक्त सातच धावांची भर घालता आली.  श्रेयस गोपालने यावेळी भेदक मारा करत सुरुवातीला कोहीली आणि त्यानंतर एबी डी'व्हिलियर्स या दोन्ही महत्वाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मोठा फटका मारण्याच्या नादात कोहलीने आपली विकेट गमावली आणि बंगळुरुला मोठा धक्का बसला. कोहलीने 30 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 57 धावा केल्या. या सामन्यात मिळालेल्या तीन जीवदानांचा फायदा डी'व्हिलियर्सला उचलता आला नाही, त्याने 20 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर बंगळुरुचा पराबव निश्चित समजला जात होता. पण त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने 19 चेंडूंत 35 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण तो बाद झाला आणि बंगळुरुचा पराबव निश्चित झाला.
 
तत्पूर्वी, बंगळुरुने नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले, पण संजूने त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दाखवून दिले. राजस्थानचा कर्णधार अजिंक्यने रहाणेने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. अजिंक्यची फलंदाजी पाहून तो मोठी खेळी साकारेल असे वाटत होते. पण ख्रिस वोक्सला मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. अजिंक्यने 20 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 36 धावांची खेळी साकारली. त्यानंतर संथ फलंदाजी करणारा राजस्थानचा सलामीवीर डी'आर्की शॉर्टला युजवेंद्र चहलने बाद केले. त्यावेळी राजस्थानचा डोलारा यशस्वीपणे सांभाळला तो संजूने. आपल्या नजाकतभऱ्या फटक्यांनी त्याने चाहत्यांची मने जिंकली आणि त्याबरोबरच संघाला विशाल धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. बेन स्टोक्स (27) बाद झाल्यावरही संजू सॅमसनने संघाचा डाव सारवला.

संजूच्या या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे 10 षटकार. आपल्या जोरकस फटक्यांनी त्याने जे षटकार लगावत डोळ्याची पारणे फेडली. संजूने एकामागून एक फटक्यांची माळ लावत फक्त 45 चेंडूंत 2 चौकार आणि 10 षटकारांच्या जोरावर नाबाद 92 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.

7.30 PM : राजस्थानचा बंगळुरुवर 19 धावांनी विजय

7.26 PM : बंगळुरुला एका षटकात 36 धावांची गरज

7.06 PM : बंगळुरु 15 षटकांत 5 बाद 134

6.53 PM : एबी डी'व्हिलियर्स OUT ; बंगळुरुला मोठा धक्का

- विराट कोहलीला बाद करणाऱ्या श्रेयस गोपालनेच बंगळुरुच्या एबी डी'व्हिलियर्सचाही काटा काढला. आतापर्यंत मिळालेल्या तीन जीवदानांचा फायदा डी'व्हिलियर्सला उचलता आला नाही, त्याने 20 धावा केल्या.

6.43 PM : विराट कोहली OUT ; बंगळुरुला हादरा 

- मोठा फटका मारण्याच्या नादात कोहलीने आपली विकेट गमावली आणि बंगळुरुला मोठा धक्का बसला. कोहलीने 30 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 57 धावा केल्या.

6.37 PM : एबी डी'व्हिलियर्सला जीवदान

- बंगळुरुचा महत्वाचा फलंदाज एबी डी'व्हिलियर्सला राजस्थानचा यष्टीरक्षक जोस बटलरने जीवदान दिले. श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर बटलरने डी'व्हिलियर्सला यष्टीचीत करण्याची संधी सोडली.

6.26 PM : विराट कोहलीचे धडाकेबाज अर्धशतक

- राजस्थानच्या गोलंदाजीवर तुटून पडत बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने 26 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीचे आयपीएलमधील हे सर्वात जलद अर्धशतक आहे.

6.35 PM : बंगळुरुला दुसरा धक्का; डी'कॉक OUT

6.18 PM : कोहली आणि डी'कॉक यांची जोरदार फटकेबाजी; बंगळुरुच्या पाच षटकांत 1 बाद 49 धावा

- कर्णधार विराट कोहली आणि डी'कॉक यांनी राजस्थानच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. त्यांच्या दमदार फटकेबाजीमुळे संघाला 5 षटकांत 49 धावा करता आल्या.

6.01 PM : बंगळुरुला पहिला धक्का; ब्रेंडन मॅक्लुलम चार धावांवर OUT

- डावाच्या चौथ्याच चेंडूवर बंगळुरुने ब्रेंडन मॅक्लुलमसारखा महत्वाचा फलंदाज गमावला. त्याने चार चेंडूंत 4 धावा केल्या.

संजू सॅमसनची वादळी फलंदाजी ; राजस्थानचे बंगळुरुपुढे 218 धावांचे आव्हान 
बंगळुरु : रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर घोंघावले ते संजू सॅमसम नावाचे वादळ आणि या वादळापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा आपल्या घरच्या मैदानातच पालापाचोळा झाला. संजूच्या या तुफानी नाबाद खेळीच्या राजस्थान रॉयल्सला बंगळुरुपुढे 218 धावांचे दमदार आव्हान ठेवता आले. 


बंगळुरुने नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले, पण संजूने त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दाखवून दिले. राजस्थानचा कर्णधार अजिंक्यने रहाणेने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. अजिंक्यची फलंदाजी पाहून तो मोठी खेळी साकारेल असे वाटत होते. पण ख्रिस वोक्सला मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. अजिंक्यने 20 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 36 धावांची खेळी साकारली. त्यानंतर संथ फलंदाजी करणारा राजस्थानचा सलामीवीर डी'आर्की शॉर्टला युजवेंद्र चहलने बाद केले. त्यावेळी राजस्थानचा डोलारा यशस्वीपणे सांभाळला तो संजूने. आपल्या नजाकतभऱ्या फटक्यांनी त्याने चाहत्यांची मने जिंकली आणि त्याबरोबरच संघाला विशाल धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. बेन स्टोक्स (27) बाद झाल्यावरही संजू सॅमसनने संघाचा डाव सारवला.

संजूच्या या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे 10 षटकार. आपल्या जोरकस फटक्यांनी त्याने जे षटकार लगावत डोळ्याची पारणे फेडली. संजूने एकामागून एक फटक्यांची माळ लावत फक्त 45 चेंडूंत 2 चौकार आणि 10 षटकारांच्या जोरावर नाबाद 92 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली.

 

5.43 PM : संजू सॅमसनची धडाकेबाज फलंदाजी ; बंगळुरुपुढे 218 धावांचे आव्हान

-  संजू सॅमसनच्या तुफानी 92 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने बंगळुरुपुढे 218 धावांचे आव्हान ठेवले. राजस्थानने अखेरच्या उमेश यादवच्या षटकात तब्बल 27 धावांची लूट केली. यामध्ये तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. संजू 

5.33 PM : राजस्थानला चौथा धक्का; जोस बटलर OUT

- ख्रिस वोक्सने 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राजस्थानच्या जोस बटलरला बाद केले. बटलरने 14 चेंडूंत 23 धावा देल्या.

5.31 PM : संजू सॅमसनचे सलग दोन षटकार

- अर्धशतकानंतर संजू अधिक आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळाला. अठराव्या षटकात त्याने सलग दोन षटकार लगावले.

5.25 PM : संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक पूर्ण; पटकावली ' ऑरेंज कॅप '

- अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स हे महत्वाचे खेळाडू बाद झाल्यावरही संजूने जोरदार फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह त्याने ' ऑरेंज कॅप 'ही पटकावली आहे.

5.14 PM : पंधरा षटकांत राजस्थान 3 बाद 129

- बेन स्टोक्स बाद झाल्यावरही संजू सॅमसनने संघाचा डाव सारवला. त्याच्या फटकेबाजीमुळे राजस्थानला पंधरा षटकांमध्ये 3 बाद 129 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात आली.

5.02 PM : राजस्थानला मोठा धक्का, बेन स्टोक्स OUT

- बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या तेराव्या षटकात स्टोक्सला  त्रिफळाचीत करत राजस्थानला मोठा धक्का दिला. स्टोक्सने 21 चेंडूंत 27 धावा केल्या.

4.50 PM : राजस्थान 10 षटकांत 2 बाद 76

- दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर संजू सॅमसन आणि बेन स्टोक्स यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी संयतपणे फलंदाजी करत संघाला 10 षटकांमध्ये 76 धावांपर्यंत मजल मारुन दिली.

4.35 PM : राजस्थानला दुसरा धक्का; डी'आर्की शॉर्ट OUT

- संथ फलंदाजी करणारा राजस्थानचा सलामीवीर डी'आर्की शॉर्टला युजवेंद्र चहलने बाद केले, डी'आर्की शॉर्टने यावेळी 17 चेंडूंत 11 धावाच करता आल्या.

4.28 PM : राजस्थानला धक्का; अजिंक्य रहाणे OUT

- अजिंक्यची फलंदाजी पाहून तो मोठी खेळी साकारेल असे वाटत होते. पण ख्रिस वोक्सला मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. अजिंक्यने 20 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 36 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

4.22 PM : पाच षटकांत राजस्थान बिनबाद 43

- प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला अजिंक्यने धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानला पाच षटकांमध्ये 43 धावा करता आल्या.

4.12 PM : अजिंक्य रहाणेचा धडाकेबाज खेळ, चौकारानंतर षटकारही फटकावला

- अजिंक्य यावेळी भन्नाट फटकेबाजी करत होती. वॉशिंग्टन सुंदरच्या तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने दमदार षटकार लगावला.

4.05 PM : अजिंक्य रहाणेचा राजस्थानसाठी पहिला चौकार

- दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेने चौकार लगावत संघाला दमदार सुरुवात करून दिली. 

3.40 PM :  बंगळुरुचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

 

दोन्ही संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु :  विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्स, युजवेंद्र चहल, उमेश यादव,  ब्रेंडन मॅक्कुलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्विंटन डी कॉक, मोहम्मद सिराज, कोरे अँडरसन, कॉलिन डी ग्रांडहोम, मुरुगन अश्विन, पार्थिव पटेल, मोइन अली, मनदीप सिंह, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साउदी, कुलवंत खेजोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे, अनिरुद्ध अशोक जोशी. 
 

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, डी'आर्की शॉर्ट, जतिन सक्सेना, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, स्टुअर्ट बिन्नी, हेनरिक क्लासेन, जोस बटलर, प्रशांत चोप्रा, संजू सॅमसन, अंकित शर्मा, अनुरीत सिंह, आर्यमान बिर्ला, बेन लॉघलीन, धवल कुलकर्णी, दुष्मांता चामीरा, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, सुधेशन मिथुन, झहीर खान, डी'आर्की शॉर्ट.
 

Web Title: RCB vs RR, IPL 2018 LIVE : Ajinkya Rahane's first four for RajasthanLIVE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.