मॅचच्या आधी धोनी-पांड्यामध्ये झाली 100 मीटरची रेस, पाहा व्हिडीओ कोण जिंकलं?

भारत आणि श्रीलंकेदरम्यान मोहालीमध्ये दुसरा वन-डे सामना सुरू आहे. सामन्यापूर्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्यात एक रेस झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 12:57 PM2017-12-13T12:57:35+5:302017-12-13T13:21:34+5:30

whatsapp join usJoin us
Prior to the match Dhoni-Pandya had a 100 meter race, see who won the video? | मॅचच्या आधी धोनी-पांड्यामध्ये झाली 100 मीटरची रेस, पाहा व्हिडीओ कोण जिंकलं?

मॅचच्या आधी धोनी-पांड्यामध्ये झाली 100 मीटरची रेस, पाहा व्हिडीओ कोण जिंकलं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली: भारत आणि श्रीलंकेदरम्यान मोहालीमध्ये दुसरा वन-डे सामना सुरू आहे. सामन्यापूर्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्यात एक रेस झाली. दोघांमधल्या या शर्यतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 100 मीटरची रेस दोघांमध्ये झाली. 
महेंद्रसिंग धोनीला आजही भारतीय क्रिकेटमधील सर्वात फिट खेळाडू म्हणून ओळखलं जातं. क्रिकेट जगतात सर्वाधिक वेगवान धावा धावणारा खेळाडू म्हणूनही धोनीची ख्याती आहे. दुसरीकडे तरूण हार्दिक पांड्या भारतीय संघाचा नवा स्टार आहे. आणि गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने संघातलं आपलं महत्व वारंवार दाखवून दिलं आहे. पण असं असतानाही दोघांमध्ये झालेल्या या रेसमध्ये धोनीने पांड्यावर मात केली.




रांचीमधून अजून एक धोनी उदयाला येणार ? दूधवाल्याच्या मुलाची भारतीय क्रिकेट संघात निवड
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांचीमधून अजून एका खेळाडूने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं आहे. झारखंडमध्ये राहणा-या पंकज यादवची आगामी आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणा-या पंकजच्या वडिलांचा दूधाचा व्यवसाय आहेत. ते एक दूधविक्रेते आहेत. 
पुढील वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापासून टुर्नामेंटला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंडर-19 वर्ल्ड कप 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. न्यूझीलंडमध्ये हा वर्ल्ड कप होणार आहे. एकूण 16 संघ वर्ल्ड कपसाठी खेळणार आहेत. सर्व देशांनी आपापले संघ घोषित केले आहेत. 
तसं पहायला गेल्यास अंडर-19 टीमचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं आहे. अंडर-19 आशिया कपमध्ये नेपाळ आणि बांगलादेशसारख्या संघांनी भारताचा पराभव केला होता. त्यामुळे वर्ल्ड कपच्या दृष्टीने भारताची चिंता वाढली आहे. 
झारखंडमधील स्थानिक क्रिकेटमध्ये पंकज यादव एक मोठं नाव आहे. पंकज यादव रांचीचा सुपरस्टार आहे असं म्हणायलाही हरकत नाही. धोनीनंतर पंकज यादवदेखील क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव नोंदवेल असं म्हटलं जात आहे. राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया विचारली असता पंकजने सांगितलं की, 'क्रिकेट माझं आयुष्य आहे. अंडर 19 विश्वचषकात उत्तम कामगिरीचा प्रयत्न करेन. धोनी आणि शेन वॉर्न माझे आदर्श आहेत'.
पृथ्वी शॉकडे भारतीय संघाचे नेतृत्व-
न्यूझीलंड येथे १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान होणा-या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व मुंबईचा तडफदार फलंदाज पृथ्वी शॉकडे सोपविण्यात आले आहे.
बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी संघाची घोषणा केली. या स्पर्धेत १६ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिर बंगलुरू येथे ८ ते २२ डिसेंबरदरम्यान होणार आहे. गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यांना वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता. यापूर्वी भारतीय संघाने २०००, २००८ व २०१२, तर ऑस्ट्रेलियाने १९८८, २००२ व २०१० मध्ये विजेतेपद जिंकले होते. मुंबईचा पृथ्वी शॉ आणि बंगालचा पॉरेल यांना रणजी करंडक सामना खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे दोघे १२ डिसेंबरपासून प्रशिक्षण शिबिरात दाखल होतील. 
संघ असा
पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभम गिल (उपकर्णधार), मंजोत कालरा, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, ऋयान पराभ, आर्यण जुयाल (यष्टिरक्षक), शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशान पॉरेल, हार्विक देसाई (यष्टिरक्षक), अर्शदीप सिंग, अनुकुल रॉय, शिवा सिंग, पंकज यादव
राखीव : ओम भोसले, राहुल चहर, निनाद राथवा, ऊर्विल पटेल.

Web Title: Prior to the match Dhoni-Pandya had a 100 meter race, see who won the video?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.