युवराज सिंगची वादळी खेळी; IPL 2019 मध्ये चौकार-षटकारांच्या आतषबाजीचे संकेत

धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याचे भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा मावळल्या असल्या तरी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याला आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:27 PM2019-01-25T13:27:29+5:302019-01-25T13:28:21+5:30

whatsapp join usJoin us
Yuvraj Singh shines for Air India with 57-ball 80 in DY Patil T20 Cup | युवराज सिंगची वादळी खेळी; IPL 2019 मध्ये चौकार-षटकारांच्या आतषबाजीचे संकेत

युवराज सिंगची वादळी खेळी; IPL 2019 मध्ये चौकार-षटकारांच्या आतषबाजीचे संकेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देयुवराज सिंग 2019च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार37 वर्षीय युवराजला गत हंगामात पंजाबकडून 8 सामन्यांत 65 धावा करता आल्या

मुंबई : धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याचे भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा मावळल्या असल्या तरी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याला आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची संधी आहे. 2019च्या आयपीएल हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई संघाने अगदी शेवटच्या क्षणाला युवराजला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यामुळे आयपीएलमध्ये युवराजची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. युवराजनेही आयपीएलमध्ये धडाकेबाज पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. 

मुंबईत सुरू असलेल्या डी. वाय. पाटील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत युवीने वादळी खेळी केली. त्याने एअर इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करताना 57 चेंडूंत 80 धावा चोपल्या. मात्र, मुंबई कस्टम्स संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. एअर इंडियाचे दोन फलंदाज अवघ्या 12 धावांवर माघारी परतले त्यानंतर युवराजने तिसऱ्या विकेटसाठी पॉल वॅल्थॅटीसह 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने सुजीत नायकसह 88 धावांची भागीदारी करताना संघाला 7 बाद 169 धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई कस्टम्सच्या विक्रमांत औटी ( 52 चेंडूंत नाबाद 86) आणि स्वप्निल प्रधान ( 53 चेंडूंत 67 धावा) करत एअर इंडियाला पराभूत केले. 

37 वर्षीय युवराज आयपीएलसाठी सज्ज होत आहे. तत्पूर्वी तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाबचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा 21 फेब्रुवारी सुरू होत आहे. तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने युवराजला 1 कोटीच्या मुळ किमतीत चमूत दाखल करून घेतले आहे. आयपीएलमध्ये युवराज प्रथमच मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. 2018मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला दोन कोटीच्या मुळ किमतीत घेतले होते. परंतु त्याला आठ सामन्यांत केवळ 65 धावा करता आल्या आणि पंजाबने त्याला करारमुक्त केले. 

 

Web Title: Yuvraj Singh shines for Air India with 57-ball 80 in DY Patil T20 Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.