१९८३च्या विश्वचषक दरम्यानचा काळ आमच्यासाठी सुवर्ण क्षण, कपिलदेव आणि टीमने सांगितले मजेशीर किस्से

१९८३च्या विश्वचषक दरम्यानचा काळ आमच्यासाठी सुवर्ण क्षण आहे. तो काळ आम्ही खूप एन्जॉय केला. खूप सा-या गोष्टी आहेत जे आम्ही सांगू शकत नाही. खरं म्हणजे जेव्हा संघ तयार झाला, तेव्हाही आम्हाला आमच्या कामगिरीवर विश्वास नव्हता. पण, सुरुवातीचे २-३ सामने जिंकल्यानंतर आम्हाला जाणीव झाली की आम्ही एक  टीम  आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 09:10 PM2017-09-27T21:10:24+5:302017-09-27T21:10:30+5:30

whatsapp join usJoin us
The World Cup in 1983, the golden moment for us, Kapil Dev and the team said funny tales | १९८३च्या विश्वचषक दरम्यानचा काळ आमच्यासाठी सुवर्ण क्षण, कपिलदेव आणि टीमने सांगितले मजेशीर किस्से

१९८३च्या विश्वचषक दरम्यानचा काळ आमच्यासाठी सुवर्ण क्षण, कपिलदेव आणि टीमने सांगितले मजेशीर किस्से

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 मुंबई - १९८३च्या विश्वचषक दरम्यानचा काळ आमच्यासाठी सुवर्ण क्षण आहे. तो काळ आम्ही खूप एन्जॉय केला. खूप सा-या गोष्टी आहेत जे आम्ही सांगू शकत नाही. खरं म्हणजे जेव्हा संघ तयार झाला, तेव्हाही आम्हाला आमच्या कामगिरीवर विश्वास नव्हता. पण, सुरुवातीचे २-३ सामने जिंकल्यानंतर आम्हाला जाणीव झाली की आम्ही एक  टीम  आहोत,  अशा शब्दांत भारताचे पहिले क्रिकेट विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
भारतीय क्रीडा क्षेत्राला कलाटणी देणारा १९८३ क्रिकेट विश्वचषकावर आधारीत चित्रपटाची बुधवारी मुंबईत घोषणा झाली. आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देवची भूमिका निभावणार आहे. यावेळी, कपिलदेव यांच्यासह विश्वविजेत्या भारतीय संघातील सर्व खेळाडू उपस्थिती होते. केवळ, लिटल मास्टर सुनील गावसकर, रवी शास्त्री आणि यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांची अनुपस्थिती यावेळी प्रकर्षाने जाणवली. सर्वच खेळाडूंनी यावेळी मजेशीर किस्से सांगताना एकच धमाल उडवून दिली. के. श्रीकांत यांनी आपल्या हटके स्टाइलमध्ये किस्से सांगताना कार्यक्रमात रंग भरले.
कपिल देव यांनी म्हटले की, पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धेतील भारताची कामगिरी पाहता ८३च्या स्पर्धेत भारताकडून विजेतेपदाची कल्पना खुद्द खेळाडूंनीही केली नव्हती. एक संघ म्हणून आम्हा स्वत:ला आमच्या कामगिरीवर विश्वास नव्हता. मात्र, सुरुवातीचे काही सामने जिंकल्यानंतर आम्हाला जाणीव झाली की आपण एक संघ आहोत.ह्ण कपिल देव यांनी काही मजेशीर किस्सेही सांगितले. ते म्हणाले, ह्यआमच्यावेळी क्रिकेट इंग्रजीमध्ये खेळला जायचा. ज्यावेळी मला कर्णधार बनवले, तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडला की, याला इंग्रजी बोलता तर येत नाही. मला आठवतं की त्यावेळी मी म्हटलेलं कोणालातरी आॅक्सफोर्डवरुन बोलवा. तो इंग्रजीमध्ये बोलेल आणि मी क्रिकेट खेळेल. ज्यावेळी, मी टीम मिटिंगमध्ये इंग्रजीमध्ये बोलायचो तेव्हा माझे सहकारी माझ्या चुका पकडण्यासाठी कायम सज्ज असायचे. त्या क्षणांचा आम्ही खूप आनंद घेतला. 
के. श्रीकांत यांनी कार्यक्रमात सर्वाधिक रंग भरले. ते म्हणाले, ह्यपहिल्या दोन विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता, ८३ च्या स्पर्धेत भारत विजेता होईल, असे म्हणणे त्यावेळी वेडेपणाचे होते. त्यात पहिलाच सामना बलाढ्य वेस्ट इंडिजविरुध्द असताना कर्णधार कपिलने हा सामना आपण जिंकू शकतो असे म्हटले. त्यावेळी आम्ही त्याला अक्षरश: वेड्यात काढले. त्यावेळी विंडीजची फलंदाजी भक्कम होतीच, शिवाय असे खतरनाक गोलंदाज होते की त्यांची आता आठवणही काढावीशी वाटंत नाही. माझं नुकताच लग्न झालेलं, त्यामुळे मी लंडनवरुन अमेरिकेला सुट्ट्यांसाठी जाणार होतो. त्यावेळी संघातील बहुतेक खेळाडूंनी अमेरिकेची तिकिटे बुक केली होती. पण नंतर सर्व इतिहास घडला आणि आम्हाला यूएस तिकिट रद्द करावे लागले. हा इतिहास केवळ कपिल देव या व्यक्तीमुळे घडला. त्याने देशाला विश्वविजेता बनवलं.ह्ण
 
उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मी आणि मोहिंदरने १२-१२ षटके टाकून ५४ धावांत ४ बळी घेतले होते. त्यामध्ये मी इयान बोथमचा बळी घेतला होता. मी टाकलेला चेंडू खूप खाली राहून वळालेला. मी बोथमचा त्रिफळा उडवल्याने प्रेक्षकही धावत आले होते. काहिंनी माझ्या खिशात ५० पौंडचे नोट भरले. अजूनही ते नोट माझ्याकडे आहेत. त्यावेळी, कपिलने अभिनंदन केले, पण विचारले की,  एकतंर चेंडू खाली राहू शकतो किंवा वळू शकतो. पण तू हे दोन्ही कसं केलंस? मी त्याला म्हणालो की, हे एक सिक्रेट आहे आणि यासाठी मी खूप मेहनत घेतली. पण खरं सांगतो, ३४ वर्ष झाली त्या घटनेला पण अजूनपर्यंत मला माहीत नाही, बोथमचा बळी मी कसा मिळवला.
- कीर्ती आझाद
 
विश्वचषक स्पर्धेच्या आधी मार्च महिन्यात माझं लग्न झालं होतं आणि सुनील गावसकरने मला वर्ल्डकपनंतर अमेरिकेला सुट्टीसाठी जाण्याचा प्लान सांगितला. जवळपास सर्वच खेळाडूंनी अमेरिकेचे तिकिट बुक केले होते. ८३च्या वर्ल्डकप आधी भारत ७५ आणि ७९ च्या वर्ल्डकपमध्येही खेळला होता आणि केवळ एका संघाला नमवले होते. तो संघ होता ईस्ट आफ्रिका. गुजराथी लोकांचा तो संघ होता बाकी त्यात विशेष काही नव्हते. ७९व्या वर्ल्डकपमध्ये कसोटीचा दर्जाही न मिळवलेल्या श्रीलंकेकडून भारत पराभूत झाला होता. त्यामुळे ८३व्या वर्ल्डकपमध्ये भारत जिंकणार अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण भारताने प्रवेश मिळवल्याने छोटी पिकनिक म्हणून पत्नीलाही सोबत घेतले. त्यानंतर यूएसचा प्लान होता. आमचा पहिल सामन विंडीजविरुध्द होता. टीम मिटिंग रंगल्या. काय चर्चा करायची काहीच कळंत नव्हत. पण कॅप्टन कपिलदेव म्हणाला आपण विंडिजला हरवू शकतो. तेव्हा आम्ही त्याला वेडात काढले होते. पण कपिल खूप गंभीर होता. कपिल खूप प्लानिंग करत होता आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. त्यावेळी विंडीजकडे बलाढ्य फलंदाज होतेच पण असे खतरनाक गोलंदाज होते की त्यांची आठवणही कोणाला काढावीशी वाटत नाही. अशा खतरनाक संघाविरुध्द कपिल जिंकण्याची भाषा करत होता. पण त्याच्यामुळे आम्हीपण थोडे गंभीर झालो. त्यानंतर सगळा इतिहास घडला पण हा इतिहास एका व्यक्तीमुळे घडला ती व्यक्ती म्हणजे कपिलदेव. स्वत:वर असलेल्या विश्वासामुळे त्याने भारताला विश्वविजेता बनविले.
- के श्रीकांत
 
७५ -७९ च्या वेळी वर्ल्डकप म्हणजे आम्ही सुट्टीवर जात होतो. पण ८३ दौरा खूप वेगळा होता. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मी आणि यशपाल फलंदाजीला होतो. त्यावेळी लंच आणि टी ब्रेकही व्हायचा. लंचच्या आधी सनी, श्रीकांत बाद झाले असल्याने आम्ही थोडे हळू खेळत होतो. यशला बोललो विकेट टाकायच्या नाहीत, षटके खूप आहेत. टी-ब्रेकमध्ये डेÑसिंगरुममध्ये गेल्यावर सन्नाटा होता. आमच्याशी कोणीच काही बोलले नाही. चहा - पाणीही विचारले नाही. काहीच कळंत नव्हते. प्लानिंगनुसारच खेळत होतो आम्ही. ब्रेक संपवून मैदानात जात असतानाही कोणीच काही बोलले नाही. पुर्ण संघ आमच्याशी नाराज होता हे कळून चुकलं. त्यामुळे मी यशला आरामात खेळण्याचा सल्ला देत स्वत: आक्रमक होण्याचे ठरवले. पहिल्या षटकात चौकार मारल्यानंतर यशही आक्रमक झाला. पुढच्या षटकात त्याने हवेतून चौकार मारला. मी त्याला शांत राहण्यास सांगितले पण त्याने ऐकले नाही. यानंतर संघाच्या धावांचा वेग वाढला. यानंतर बॉब विलिस गोलंदाजीस आला. यशने त्याला बाहेर येऊन षटकार ठोकला. त्याच्या जोरावर आम्ही हा सामना जिंकलो. ती यशकडून झालेली अप्रतिम खेळी होती.
- मोहिंदर अमरनाथ
 

Web Title: The World Cup in 1983, the golden moment for us, Kapil Dev and the team said funny tales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.