WIPL2019 : मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जची आतषबाजी, सुपरनोव्हाजच्या 142 धावा

WIPL2019: मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जची वादळी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 09:04 PM2019-05-09T21:04:31+5:302019-05-09T21:04:50+5:30

whatsapp join usJoin us
WIPL2019: Jemimah Rodrigues 77 runs knock, Supernovas set 143 runs target to Velocity | WIPL2019 : मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जची आतषबाजी, सुपरनोव्हाजच्या 142 धावा

WIPL2019 : मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जची आतषबाजी, सुपरनोव्हाजच्या 142 धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जयपूर, महिला आयपीएल 2019 : मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जच्या वादळी खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने महिला आयपीएल स्पर्धेत गुरुवारी व्हेलॉसिटी संघाविरुद्ध 3 बाद 142 धावा उभ्या केल्या. जेमिमाने नाबाद 77 धावांची खेळी केली. 



नाणेफेक जिंकून मिताली राजच्या व्हेलॉसिटी संघाने हरमनप्रीतच्या सुपरनोव्हाज संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रिया पुनिया आणि चमारी अथापट्टू यांनी सावध सुरुवात केली, परंतु पाचव्या षटकात पुनिया ( 16) माघारी परतली. शिखा पांडेने तिला बाद केले. त्यानंतर आलेल्या जेमिमाने दुसऱ्या विकेटसाठी अथापट्टूसह अर्धशतकी भागीदारी केली. अॅमेला केरने ही भागीदारी तोडली. तिने अथापट्टूला ( 31) बाद केले. जेमिमाने एका बाजूने फटकेबाजी सुरू ठेवली होती. तिने 31 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.




त्यानंतरही जेमिमाचा झंझावात थांबला नाही. तीने मैदानी फटक्यांवर भर देताना चौकारांची रांग लावली. जेमिमाने 48 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 77 धावा केल्या. 



 

Web Title: WIPL2019: Jemimah Rodrigues 77 runs knock, Supernovas set 143 runs target to Velocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.