जेव्हा सचिन लॉर्ड्सवर गांगुलीला म्हणाला होता, तू फक्त खेळत राहा

पहिल्याच सामन्यात मी शतक झळकावले होते. आनंद गगनात मावेनासा झाला होता. चहापानापर्यंत मी शतक पूर्ण केले होते. पण चहापानाच्यावेळी मला जाणवले की माझ्या बॅटमधून चांगले फटके लागत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 11:55 AM2018-03-02T11:55:18+5:302018-03-02T11:55:18+5:30

whatsapp join usJoin us
When Sachin said to Ganguly at Lord's, you just keep playing | जेव्हा सचिन लॉर्ड्सवर गांगुलीला म्हणाला होता, तू फक्त खेळत राहा

जेव्हा सचिन लॉर्ड्सवर गांगुलीला म्हणाला होता, तू फक्त खेळत राहा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसचिनची ही दोस्ती मी कधीच विसरू शकणार नाही.

माझा तो पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. परिसिस्थी फार काही चांगली नव्हती. लॉर्ड्ससारख्या ऐतिहासिक मैदानावर आम्ही खेळत होतो. 1996 सालची ही गोष्ट. मी शतक झळकावत संघाला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करत होतो. पण शतक झाल्यावर एक समस्या आली. माझ्यावर त्या समस्येचे उत्तर नव्हते. काय करायचे ते काहीच समजत नव्हते. त्यावेळी सचिन तेंडुलकरने माझी मदत केली, असं सौरव गांगुलीने 'अ सेंचुरी इज नॉट इनफ' या आत्मचरीत्रामध्ये लिहीले आहे. या आत्मचरीत्रामध्ये गांगुलीने काही गोष्टींचा उलगडा केला आहे. यामध्ये प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्याबरोबरच्या काही गोष्टींचाही उलगडा करण्यात आला आहे. कारण गांगुली चॅपल यांच्यासाठी आग्रही होता, त्यानंतर चॅपेल यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुराही सोपवण्यात आली. पण कालांतराने गांगुली आणि चॅपेल यांच्यामध्ये विस्तवही जात नव्हता.
गांगुली आणि सचिन यांनी बराच काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र वेळ व्यतित केला आहे. या दोघांमध्ये चांगली मैत्रीही पाहायला मिळाली होती. पण सचिनच्या बऱ्याच कालावधीनंतर गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  पण सचिन गांगुलीबरोबरच्या मैत्रीला त्याच्या पहिल्या सामन्यातही विसरला नाही.
पहिल्याच सामन्यात मी शतक झळकावले होते. आनंद गगनात मावेनासा झाला होता. चहापानापर्यंत मी शतक पूर्ण केले होते. पण चहापानाच्यावेळी मला जाणवले की माझ्या बॅटमधून चांगले फटके लागत नाहीत. मी बॅट पाहिली तेव्हा मला समजले की, हँडलमध्ये काही तरी दोष आहे. मी हँडलला टेपने गुंडाळत बसलो होतो. ब्रेक फक्त 15 मिनिटांचा होता. या 15 मिनिटांमध्ये बॅट दुरुस्त होईल की नाही, ही काळजी मला सतावत होती. मी चिंताग्रस्त असल्याचे पाहून सचिन माझ्याकडे आला. बॅट पाहून त्याला सारे काही कळले होते. त्यावेळी सचिन फक्त माझ्याकडे पाहत बसला नाही, तर मदत करण्यासाठी पुढेही सरसावला. त्यावेळी सचिनने मला धीर दिला आणि म्हणाला, जा तू जाऊन चहा घे, मी तुझी बॅट दुरुस्त करतो. कारण तुला मैदानात जाऊन अजून खेळायचे आहे, सचिनची ही दोस्ती मी कधीच विसरू शकणार नाही.

Web Title: When Sachin said to Ganguly at Lord's, you just keep playing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.