भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 290 धावांचे लक्ष्य

भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 290 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने 50 षटकात सात बाद 289 धावा केल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 04:20 PM2018-02-10T16:20:25+5:302018-02-10T21:22:38+5:30

whatsapp join usJoin us
Virat won the toss for the fourth time, Shreyas Iyer was replaced by Kedar Jadhav | भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 290 धावांचे लक्ष्य

भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 290 धावांचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देविशेष म्हणजे गुलाबी जर्सीमध्ये खेळताना त्यांनी एकही सामना गमावलेला नाही.                              शिखर धवन याने प्रत्येक सामना जिंकण्याची जिद्द असून संघात अतिआत्मविश्वास मुळीच नसल्याचे स्पष्ट केले होते.

जोहान्सबर्ग - सलामीवीर शिखर धवनचे दमदार शतक (109), कर्णधार विराट कोहलीच्या (75) धावा आणि महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद (42) धावा या तिघांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 290 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने 50 षटकात सात बाद 289 धावा केल्या. 

शिखर धवन खेळपट्टीवर असेपर्यंत भारत 300 पेक्षा जास्त धावा करेल असे वाटत होते. पण तो बाद झाल्यानंतर भारताचे फलंदाज ठराविक टप्प्याने बाद झाले. अखेरच्या एक-दोन षटकात धोनीने फलंदाजीचा गेअर बदलल्याने भारताला 290 पर्यंत पोहोचता आले. धोनीने 43 चेंडूत (42) धावा तडकावताना तीन चौकार आणि एक षटकार लगावला. दमदार शतक झळकावल्यानंतर शिखर धवन (109) धावांवर बाद झाला. मॉर्केलच्या गोलंदाजीवर त्याने डिव्हिलियर्सकडे झेल दिला. त्याच्या पाठोपाठ हुक करण्याच्या नादात अजिंक्य रहाणे (8) धावांवर बाद झाला. निगीडीने त्याची विकेट काढली. 

चौथ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवर शिखर धवनने शानदार शतक झळकावले.  करीयरमधील 100 व्या वनडे सामन्यात धवनने शतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय तर जगातील नववा फलंदाज आहे. धवनचे हे 13 वे शतक आहे. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला होता. 

दमदार फलंदाजी करणारा विराट कोहली (75) धावांवर बाद झाला आहे. मॉरीसच्या गोलंदाजीवर त्याने मिलरकडे सोपा झेल दिला. कोहली आणि धवनने दुस-या विकेटसाठी 158 धावांची भागीदारी केली. भारताच्या 31 षटकात दोन बाद 178 धावा झाल्या आहेत. विराटने 83 चेंडूत 75 धावांची खेळी करताना सात चौकार आणि एक षटकार लगावला.                                                        

चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताने चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा (5) लवकर बाद झाल्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी डाव सावरला. भारताच्या 17 षटकात 90 धावा झाल्या होत्या. रोहित शर्माला वेगवान गोलंदाज रबाडाने आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले. दोघांमध्ये आतापर्यंत 70 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली आहे.      

वनडे मालिकेत सलग चौथ्यांदा विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रकाश झोतात धावांचा पाठलाग करणे कठिण ठरेल. पहिल्या तीन सामन्यांमध्ये ज्या उत्फुर्ततेने खेळ केला तसाच चौथ्या सामन्यात खेळ करावा लागेल. या सामन्यात केदार जाधवला दुखापतीमुळे वगळण्यात आले असून त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. 

विजयाचा अश्वमेध सुसाट निघाला असताना शनिवारी खेळल्या जाणा-या चौथ्या एकदिवसीय सामन्यात विजय नोंदवून ऐतिहासिक मालिका विजयाची संधी भारतीय संघाला चालून आली आहे. दुसरीकडे यजमान द. आफ्रिकेपुढे प्रतिष्ठा वाचविण्याचे आव्हान असेल. मालिकेत ३-० अशी आघाडी मिळविलेल्या भारताला द. आफ्रिकेच्या भूमीत पहिल्या एकदिवसीय मालिका विजयासाठी एका विजयाची गरज आहे, याआधी २०१०-२०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने २-१ अशी आघाडी मिळविल्यानंतरही मालिका २-३ ने गमविली होती.

१९९२-९३ नंतर द. आफ्रिकेत झालेल्या द्विपक्षीय मालिकेत भारताने पहिल्यांदा सलग तीन एकदिवसीय सामने जिंकले. चौथा सामना जिंकून भारताला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये अव्वल स्थानाकडे कूच करण्याचीही संधी असेल. तिस-या एकदिवसीय सामन्याआधी शिखर धवन याने प्रत्येक सामना जिंकण्याची जिद्द असून संघात अतिआत्मविश्वास मुळीच नसल्याचे स्पष्ट केले होते.

पिंक वन डे...
स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागृती निर्माण करण्याच्या हेतूने हा एकदिवसीय सामना खेळविला जाईल. अशा प्रकारच्या सामन्याचे पहिल्यांदा आयोजन २०११ मध्ये झाले होते.या सामन्यासाठी द. आफ्रिका संघ गुलाबी जर्सी परिधान करुन खेळतात. विशेष म्हणजे या गुलाबी जर्सीमध्ये खेळताना त्यांनी एकही सामना गमावलेला नाही.                              

Web Title: Virat won the toss for the fourth time, Shreyas Iyer was replaced by Kedar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.