आजचाच तो दिवस जेव्हा सचिन तेंडुलकरने द्विशतक झळकावत केला होता 'न भूतो' पराक्रम

2010 मध्ये आजच्याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय सामन्यात 200 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 11:32 AM2018-02-24T11:32:10+5:302018-02-24T16:21:19+5:30

whatsapp join usJoin us
Today is the day when Sachin Tendulkar becomes first batsman to hit double century | आजचाच तो दिवस जेव्हा सचिन तेंडुलकरने द्विशतक झळकावत केला होता 'न भूतो' पराक्रम

आजचाच तो दिवस जेव्हा सचिन तेंडुलकरने द्विशतक झळकावत केला होता 'न भूतो' पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - आज २४ फेब्रुवारी... २०१० मध्ये याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास घडला होता. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका वीराने द्विशतक झळकावण्याचा 'न भूतो' पराक्रम केला होता. तो विश्वविक्रमवीर होता, अर्थातच आपला लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरच्या नावे अगणित रेकॉर्ड्स आहेत, पण सचिनने ठोकलेलं द्विशतक अजूनही त्याचे चाहते विसरलेले नाहीत. 

आज 24 फेब्रुवारी आहे. 2010 मध्ये आजच्याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय सामन्यात 200 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. ग्वालिअरमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात सचिन 200 धावांवर नाबाद राहिला होता. सचिनने यासोबत आपल्या नावे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले होते. विशेष म्हणजे या द्विशतकासोबत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा सचिन तेंडुलकर पहिला फलंदाज ठरला होता. 

200 धावा करुन नाबाद खेळी करणा-या सचिनने 147 चेंडूंचा सामना केला होता. त्याने 200 धावांच्या खेळीत 25 चौकार आणि तीन षटकार लगावले होते. सचिनच्या या ऐतिहासिक खेळीनिमित्त आयसीसीने शुक्रवारी ट्विटही केलं. या ट्विटमध्ये सचिनच्या द्विशतकी खेळीचे आकडे देण्यात आले होते. ट्विटमध्ये लिहिण्यात आलं होतं की, 'आजच्याच दिवशी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने ग्वालिअरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात 200 धावांची खेळी करत असा रेकॉर्ड करणारा पहिला फलंदाज बनला होता'. सचिन तेंडुलकरनंतर विरेद्र सेहवाग आणि रोहित शर्मासहित जगातील पाच फंलदाजांनी आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकलं आहे. 


ग्वालिअरमधील कॅप्टन रुपसिंह स्टेडिअममध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुस-या एकदिवसीय सामन्यात सचिनने 200 धावांची जबरदस्त खेळी केली होती. सचिनने केलेल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने तीन विकेट गमावत 401 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका संघ मात्र 43 ओव्हर्समध्येच 248 धावा करुन ऑल आऊट झाला होता. भारताने हा सामना 153 धावांनी जिंकला होता. 

Web Title: Today is the day when Sachin Tendulkar becomes first batsman to hit double century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.