2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी श्रीलंका पात्र, या संघाला खेळावी लागणार पात्रता फेरी

भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवानंतर श्रीलंका संघ 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी लंका अपात्र ठरला होता. मात्र, इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केल्यामुळे लंकाचे तिकीट पक्के झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 04:00 PM2017-09-22T16:00:50+5:302017-09-22T16:03:38+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lanka qualify for 2019 ICC World Cup | 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी श्रीलंका पात्र, या संघाला खेळावी लागणार पात्रता फेरी

2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी श्रीलंका पात्र, या संघाला खेळावी लागणार पात्रता फेरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई, दि. 22 - भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवानंतर श्रीलंका संघ 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी लंका अपात्र ठरला होता. मात्र, इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केल्यामुळे लंकाचे तिकीट पक्के झाले आहे. मात्र एकेकाळचा दादा संघ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडीजचा संघ 2019 सालामध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळवण्यापासून वंचित राहिला आहे. इंग्लंडने येथे झालेल्या पहिल्या वन डेत वेस्ट इंडीजला 7 गडी व 67 चेंडू राखून हरवले आणि पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे मात्र वेस्ट इंडीजच्या स्वप्नांना सुरुंग लागला. याचसोबत क्रिकेटच्या मैदानात न लढताच श्रीलंकेला वर्ल्ड कपचे तिकीट बुक करता आले.

वन डे वर्ल्ड कपमध्ये पात्र ठरण्यासाठी 30 सप्टेंबर ही डेडलाइन ठरवण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडीजला सध्या सुरू असलेल्या मालिकेत इंग्लंडवर 4-0 किंवा 5-0 अशा फरकाने विजय मिळवणे आवश्यक होते. पण तसे होताना दिसत नाही. तसेच सध्या वेस्ट इंडीजचे 78 गुण असून आता पहिल्या पराभवानंतर त्यांना श्रीलंकेला (86 गुण) ओलांडता येणार नाही हे निश्चित झाले आहे.  त्यामुळे 2019 चा वर्ल्ड कप खेळायचा असल्यास त्यांना पात्राता फेरी पार करावी लाणार आहे.

वेस्ट इंडीजच्या संघाला थेट प्रवेश मिळवता आला नसला तरीही त्यांच्यासाठी विश्वचषकाची दारं अद्याप बंद झालेली नाहीयेत. पुढच्या वर्षी होणा-या विश्वचषक पात्रता स्पर्धेत पहिल्या दोन स्थानांवर वेस्ट इंडीजचा संघ राहिल्यास त्यांना 2019 साली इंग्लंड येथे होणा-या विश्वचषकात प्रवेश मिळू शकेल असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. ज्या संघांना थेट प्रवेश मिळत नाही त्यांना पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत स्थान मिळवावे लागते. पात्रता फेरीत रँकिंगमध्ये तळाच्या स्थानावर असलेले चार, विश्व क्रिकेट लीग चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थानावर असलेले चार आणि विश्व क्रिकेट लीगमधील आघाडीचे दोन असे एकूण दहा संघ खेळतात. 

इंग्लंडमध्ये होणा-या वर्ल्ड कपमध्ये पात्र ठरणारा श्रीलंका आठवाच संघ ठरला आहे. याआधी भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश या संघांनी थेट प्रवेश मिळवला होता. या स्पर्धेसाठी फक्त आठच संघांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये होणारा वर्ल्ड कप हा30 मे ते 15 जुलै या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.

Web Title: Sri Lanka qualify for 2019 ICC World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.