सचिन तेंडुलकरचे गुरू 'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांचं निधन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सचिन तेंडुलकर नावाचा हिरा देणारे आधुनिक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 06:50 PM2019-01-02T18:50:11+5:302019-01-02T19:36:23+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar's Guru Ramakant Achrekar passed away | सचिन तेंडुलकरचे गुरू 'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांचं निधन

सचिन तेंडुलकरचे गुरू 'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांचं निधन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं.  ते 86 वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 



1932 सालचा त्यांचा जन्म. त्यांनी 1943 साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी यंग महाराष्ट्र एकादश, गुल मोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी केवळ एक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. 1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता.

पण, क्रिकेटपटूपेक्षा प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. बऱ्याच काळापासून ते आजारी होते. आचरेकर सर घरातूनही कमीच बाहेर पडत. त्यांना 1990 साली द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2010 मध्ये त्यांना पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. 12 फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 

Web Title: Sachin Tendulkar's Guru Ramakant Achrekar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.